Agriculture news in marathi, Mohite Patil, Sopal in state bank case | Agrowon

राज्य बॅंक प्रकरणात मोहिते पाटील, सोपल

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑगस्ट 2019

सोलापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील व्यवहारात अनियमितता असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन संचालकांवर पाच दिवसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल यांची नावे आहेत. त्यामुळे या नेत्यांच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे मोहिते पाटील हे सध्या भाजपवासी झाले आहेत, तर सोपलही पक्षबदलाच्या तयारीत आहेत. अशातच हा निर्णय आल्याने ही चलबिचल आणखीनच वाढली आहे.

सोलापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील व्यवहारात अनियमितता असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन संचालकांवर पाच दिवसांत गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल यांची नावे आहेत. त्यामुळे या नेत्यांच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे मोहिते पाटील हे सध्या भाजपवासी झाले आहेत, तर सोपलही पक्षबदलाच्या तयारीत आहेत. अशातच हा निर्णय आल्याने ही चलबिचल आणखीनच वाढली आहे.

सोलापूर हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पक्षाच्या पहिल्या फळीतील नेते म्हणून ओळखले जाणारे मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षापासून फारकत घेत भाजपशी जवळीक साधली. त्यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी यापूर्वीच भाजपात जाहीर प्रवेश केला. आता राज्य बॅंकेच्या प्रकरणात त्यांचे नाव आल्याने मोहिते पाटील गटात चलबिचलता वाढली आहे. मोहिते पाटील हे राज्य बॅंकेचे अध्यक्ष, तसेच अनेक वर्षे संचालकही होते. 

दुसरीकडे बार्शीचे आमदार सोपल हेही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. सध्या राज्यातील राजकारणाची बदलती परिस्थिती पाहता, त्यांनीही पक्षबदलाचा विचार सुरू केला आहे. लवकरच ते शिवबंधन हातात बांधण्याच्या तयारीत आहेत. पण, त्याआधीच राज्य बॅंक प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर ते अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्यांचा प्रवेश होणार की लांबणार? की ते आहे तिथेच राहणार, याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.


इतर बातम्या
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमानपुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’चक्रीवादळ अलिबागनजीक...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...