ग्रामपंचायत स्तरावर हवे ‘मॉईश्‍चर’ मीटर

ग्रामपंचायत स्तरावर हवे ‘मॉईश्‍चर’ मीटर
ग्रामपंचायत स्तरावर हवे ‘मॉईश्‍चर’ मीटर

नागपूर : अधिक ओलाव्याच्या कापसाला प्रती एक टक्‍क्‍याप्रमाणे प्रती किलो दर कपातीचा नियम आहे. त्यानुसार चार टक्‍क्‍यांपेक्षा कमी आर्द्रता असलेल्या कापसाला प्रोत्साहनपर दर देण्याची तरतूद आहे. परंतु, या निकषाचे पालनच होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गावस्तरावरच शेतकऱ्यांना आर्दता मोजता यावी, याकरिता  ‘मॉईश्‍चर’ मीटर ग्रामपंचायतस्तरावर उपलब्ध करून देण्याचा पर्याय पुढे येत आहे.  कापूस खरेदीत एफएक्‍यु दर्जाचा कापसाला हमीभाव दिला जातो. त्याकरिता कापसातील आर्दता मोजली जाते. ८ ते १२ टक्‍के ओलावा असलेला कापूसच खरेदी करण्याची पद्धत आहे. १२ टक्‍केपेक्षा अधिक आर्द्रता असलेला कापूस नाकारला जातो. आठ टक्‍क्‍यांपर्यंत आर्द्रतेसाठी हमीभाव दिला जातो. त्यानंतर प्रती टक्‍का आर्द्रतेसाठी प्रती किलो कापसाचे पैसे कापण्याचा नियम आहे. ९ टक्‍के आर्दता असल्यास हमीभावानुसार प्रती किलोचे पैसे कापले जातात, दहा टक्‍क्‍यांसाठी दोन किलो याप्रमाणे ८ ते १२ टक्‍के आर्द्रतेसाठी फरकातील चार टक्‍के अर्थात चार किलोचे पैसे कापले जातात.  हा नियम काटेकोरपणे पाळला जात असतानाच चार टक्‍केपेक्षा कमी आर्दता असलेल्या कापसाला प्रती किलो प्रमाणे जादा दर देण्याच्या निकषाकडे मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार चार टक्‍के पेक्षा कमी आर्द्रता असेल त्याला प्रती कमी टक्‍क्‍यासाठी प्रती किलो वाढीव पैसे देण्याची तरतूद आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांत या शिफारसीनुसार प्रोत्साहन दर एकाही शेतकऱ्याला मिळाला नाही.   गावातच हवे ‘मॉईश्‍चर’ मीटर कापसात आर्द्रता किती हे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर गेल्यावरच कळते. त्यामुळे आर्दतेआड त्यांच्या फसवणुकीचे प्रकार घडतात. मॉईश्‍चर मीटरची किंमत ११ हजार रुपये असून शेतकऱ्यांना वैयक्‍तिकरीत्या घेणे शक्‍य नसले तरी गट किंवा ग्रामपंचायतस्तरावर याची खरेदी व्हावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ गोविंद तज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी व्यक्‍त केली. या माध्यमातून कापसातील मॉईश्‍चरचा अंदाज घेणे शेतकऱ्यांना गावातच शक्‍य होईल. दरम्यान वर्धा येथील खासदार रामदास तडस यांनी या संकल्पनेनुसार वर्धा जिल्ह्यात ६ लाख रुपये  ‘मॉईश्‍चर’ मीटरसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.  परिपक्‍व कापसात अधिक ओलावा महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या सूत्रांनी नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर माहिती दिली. त्यानुसार, परिपक्‍व कापूस हाच केवळ एफएक्‍यू दर्जाचा असतो. परंतु अशा कापसात आठ टक्‍केपेक्षा कमी ओलावा असण्याची शक्‍यता फारच कमी राहते. एक, दोन वेचणीतील कापसालाच एफएक्‍यू दर्जा राहतो. त्यानंतर कापसाची प्रत प्रत्येक वेचणीला खालावते. मॉईश्‍चर प्रमाणानुसार प्रोत्साहन दर देण्याचा नियम आहे. परंतु कमी  ‘मॉईश्‍चर’ असलेला कापूस येतच नाही, त्यामुळे प्रोत्साहन दर देण्याचा प्रश्‍नही निर्माण होत नाही.  हमीभावानुसार असे मिळतील प्रोत्साहन दर

ओलावा प्रोत्साहन दर
४ टक्‍के    २२० रुपये 
५ टक्‍के १६५.५० रुपये 
६ टक्‍के ११० रुपये 
७ टक्‍के  ५५ रुपये 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com