Agriculture News in Marathi At the moment of Dussehra Agap kharif onion Rs 5,555 | Page 2 ||| Agrowon

दसऱ्याच्या मुहूर्तावर  आगाप खरीप कांदा ५,५५५ रुपये 

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 ऑक्टोबर 2021

नाशिक जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर आगाप खरीप लाल कांदा आवक सुरू होण्याची प्रथा आहे. यंदा उमराने येथील श्री. रामेश्‍वर कृषी मार्केट येथे सर्वाधिक १२०० क्विंटल कांदा आवक झाली. 

नाशिक : जिल्ह्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर आगाप खरीप लाल कांदा आवक सुरू होण्याची प्रथा आहे. यंदा उमराने येथील श्री. रामेश्‍वर कृषी मार्केट येथे सर्वाधिक १२०० क्विंटल कांदा आवक झाली. येथे प्रति क्विंटलला उच्चांकी ५ हजार ५५५ रुपये दर सावळीराम गोपाळा ठाकरे (कुंभार्डे, ता. देवळा) यांच्या कांद्याला मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

उमराणे येथील श्री. रामेश्‍वर कृषी मार्केटमध्ये ह. भ. प. नामदेव महाराज यांच्या हस्ते लिलाव सुरू झाले. १२२ वाहनातून एकूण अंदाजे १२०० क्विंटल आवक झाली. किमान ५००, कमाल ५५५५, तर सरासरी दर ३००० राहिला. ठाकरे यांनी सजवलेल्या बैलगाडीतून कांदा विक्रीसाठी आणला होता. या वेळी वेदांती अडत दुकानाचे योगेश व्यंकट पगार यांनी बोली लावली.

या वेळी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू काका देवरे, उमराणेचे माजी सरपंच प्रकाश कांतीलाल ओसवाल, माजी सभापती राजू देवरे, श्रीरामेश्‍वर कृषी मार्केटचे संचालक श्रीपाल प्रकाश ओस्तवाल, पुंडलिक आनंदा देवरे, व्यापारी संतोषजी बाफना, प्रवीण बाफना, गौतम डुंगरवाल, चिंधू खैरे, बबनराव नेहारकर, विलास आहिरे, रितेश आहिरे, दिनेश देवरे, शैलेश देवरे, किशोर जाधव, सचिन देवरे, भाऊसाहेब देवरे, दीपक पगारे, दिनेश पारख, नितीन काला, मनोज कर्णावट, नीलेश पारख, अमोल देवरे, हरिदास जाधव, प्रवीण निकम व मार्केटचे सचिव दौलतराव शिंदे, उपसचिव, कर्मचारी, माथाडी वर्ग आदी उपस्थित होते. 

स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत खरीप कांद्याची ५५ वाहनांतून अंदाजे १२०० क्विंटल आवक झाली. उमराणे येथील शेतकरी रणजित देवरे यांच्या बैलगाडीतून आणलेल्या कांद्यास सर्वोच्च ५,१५१ रुपये भाव मिळाला. या वेळी कांदा व्यापारी रामराव खंडेराव देवरे यांनी बोली लावली. बाजार समितीचे प्रशासक फयाज मुलानी यांच्या हस्ते लिलाव सुरू झाले. या वेळी कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश बाफना, कांदा व्यापारी सुनील दत्तू देवरे, महेंद्र मोदी, सचिव नितीन जाधव, सह.सचिव तुषार गायकवाड आदी उपस्थित होते. 

आवेकत मोठी घट 
प्रामुख्याने मालेगाव, चांदवड व देवळा तालुक्यांत आगाप लागवडी जास्त असतात, मात्र पावसामुळे गणित बिघडले आहे. बुरशीजन्य रोगांमुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे जवळपास हजार वाहनातून होणारी आवक २००च्या आत आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात तूट असल्याने दरात तेजी राहण्याची चिन्हे आहेत. 

 


इतर बातम्या
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी समितीच्या...सिंधुदुर्गनगरी ः ‘‘बियाणे किट वितरण आणि...
सांगली जिल्ह्यात ‘किसान सन्मान’ची वसुली...सांगली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील अपात्र...
सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणी ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात गाळपात...औरंगाबाद : ‘‘मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड...
मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७५ मोठ्या, मध्यम, लघू...
नाशिक ः सिन्नरच्या पाणी प्रकल्पाचा...नाशिक : नाशिक व सिन्नरच्या विकासासाठी आवश्यक पाणी...
जळगाव जिल्ह्यात १७ हजार बेडची सज्जता जळगाव ः जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या...
नांदेड जिल्ह्यात पाच लाख खातेदारांना ‘...नांदेड जिल्ह्यात : पंतप्रधान किसान सन्‍मान निधी (...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
वीजजोड जबरदस्तीने तोडल्यास जशास तसे...सांगली ः महावितरण कंपनीने शेतीपंपांची वीजबिल वसूल...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...
गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...औरंगाबाद ः ‘‘गोदावरी, पैनगंगा उपखोऱ्याची तूट भरून...
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
खानदेशात अनेक गावांमधील शिवारात वीज बंद जळगाव ः  खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबारमधील...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...