agriculture news in Marathi, money deduction form farmers payment in Malegaon APMC, Maharashtra | Agrowon

मालेगाव बाजार समितीत ‘इतर’च्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 जून 2019

अडत नियमानुसार घेतली जात नाही. मात्र, वेगळ्या पद्धतीने वसूल केली जाते. बाजार समिती व बिगर बाजार समिती नियंत्रित ठिकाणी होत असलेल्या लिलावाबाबत शासनाने लक्ष घालावे. यातून शेतकऱ्यांची लूट थांबेल. जर असा प्रकार पुन्हा घडला तर आंदोलन छेडण्यात येईल. 
- दीपक पगार, प्रांतिक सदस्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना

नाशिक: मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘इतर’ या नावाखाली शेतकऱ्यांच्या पैशातून कपात सुरू असल्याचे निदर्शनास आले. संबंधित शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तक्रार केल्यानंतर मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने ही बाब गांभीर्याने घेतली असून संबंधित आडत्यावर कारवाई करणार असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेतकरी संदीप काकडे यांनी बाजार समितीमध्ये संबंधित व्यापाऱ्याला हिरवी मिरची दिली असता. त्यांना व्यापाऱ्याने व्यवहार पावती दिली. सदर पावतीवर पैशाचा तपशील व खाली ''इतर'' या नावाखाली रक्कम कापलेली होती. विशेष म्हणजे दिलेल्या पावतीवर ''इतर'' हा रकाना मुद्रित केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली आहे. 

सदर घटनेबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक पगार व शेतकऱ्यांनी सहायक निबंधक, मालेगाव यांना फोन करून याची कल्पना दिली. त्याचप्रमाणे त्यांना पुरावे सादर केले. त्यासोबत अशाप्रकारे कोणी व्यापारी चुकीच्या पद्धतीने आडत घेऊन लूट करत असेल तर लक्ष घालावे, असे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आले. त्यानुसार या प्रकरणाबाबत सहायक निबंधक श्री. बदनाळे यांनी बाजार समितीला त्वरित कारवाई करण्यास भाग पाडले. 

मासिक मीटिंगमध्ये संचालक मंडळाने याची दखल घेत, ‘‘जो व्यापारी अशा गैरप्रकारे आडत घेत असेल त्याचे लायसन्स त्याच ठिकाणी निलंबित करण्यात येईल, तसेच बाजार समितीने दिलेला गाळा लगेच खाली करून घेतला जाईल,’’ अशा स्वरूपात प्रत्येक व्यापाऱ्याला नोटीस पाठवल्या आहेत. यासह या प्रकरणाबाबत चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यामुळे यात आडत्याकडून गैरव्यवहार घडल्याचे समोर आले आहे. 

बाजार समितीचा सेस बुडविण्याचा प्रकार 
अजूनही अनेक फळव्यापारी कोऱ्या कागदावर हिशेबपट्ट्या तयार करतात. हा व्यवहार कुठल्याही रेकॉर्डवर नसतो. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता नसते. बाजार समितीचा महसूल बुडतो. या व्यवहारानुसार जो सेस बाजार समितीला मिळणार असतो, तो दडपण्याचा प्रकार असल्याचे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया
शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. याबाबत काम सुरू असून संबंधित व्यापाऱ्याच्या संदर्भात चौकशी समिती नेमून चौकशी झाली. यात हा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. त्यावर आम्ही लवकरच कारवाई करणार आहोत. जर कुणी असा गैरप्रकार केला तर परवाने निलंबित करणार आहे. असा प्रकार घडल्यास शेतकऱ्यांनी थेट तक्रार करावी. 
- राजेंद्र जाधव, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मालेगाव

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...