‘टीडीएस’चे वसूल केलेले पैसे शेतकऱ्यांना देणार

बाजार समितीत शेतकऱ्यांकडून वसुली इतर अडतदारांनीहीकेली आहे. पण कारवाई एकावरच व्हायला नको. यापुढे गैरप्रकारहोऊ नयेत. कारवाई करायचीच असली तर ती कठोर स्वरूपात नकरता एक दोन महिने परवाना निलंबित करावा आणि शेतकऱ्यांचेवसूल केलेले पैसे अडतदारांनी परत मिळावेत, असे मी बैठकीत सांगितले. यावर अडतदारांनी वसूल केलेले पैसे परत देऊ असेम्हटले. - मोहन भिसे, शेतकरी, हेंद्रूण, ता. जि. धुळे
‘टीडीएस’चे वसूल केलेले पैसे शेतकऱ्यांना देणार
‘टीडीएस’चे वसूल केलेले पैसे शेतकऱ्यांना देणार

धुळे ः हेंद्रूण (ता.जि. धुळे) व इतर भागांतील ज्या शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस’च्या नावे वसुली केली, त्या अडतदाराची माहिती बाजार समिती प्रशासनाला मिळाली आहे. परंतु अडतदाराचा व्यवसाय व इतर परवाने रद्द करू नका, अशी भूमिका हेंद्रूणचे शेतकरी मोहन भिसे व इतरांनी घेतल्याने बाजार समिती प्रशासनाने अडतदारांवर कारवाई केली नाही. ज्यांनी टीडीएसच्या नावे वसुली केली, त्या अडतदारांनी शेतकऱ्यांचे पैसे परत करण्याची भूमिका घेतली आहे, अशी माहिती शेतकरी भिसे यांनी दिली आहे.   टीडीएसच्या वसुलीसंबंधी ॲग्रोवनने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर यासंबंधी सोमवारी (ता. १७) बाजार समिती प्रशासनाने अडतदार व हेंद्रूणच्या शेतकऱ्यांना बोलावून चौकशी केली. शेतकऱ्यांचे नेतृत्व मोहन भिसे यांनी केले.  बाजार समिती प्रशासनाने टीडीएसच्या नावे कुणी वसुली केली, याची नेमकी माहिती घेतली. ही वसुली बेकायदेशीर असल्याचे समोर आले. यावर संबंधित अडतदाराचा परवाना रद्द करण्याची भूमिका या बैठकीत प्रशासनाने घेतली. त्यावर शेतकऱ्यांनी मात्र बेकायदेशीर वसुली तर सर्वच करतात, पण एकाच अडतदाराला शिक्षा करू नका, असे सांगितले. ज्यांनी वसुली केली, त्यांच्याकडून पैसे परत मिळावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावर संबंधित अडतदारांनी आपण पैसे परत करू व पुढे कुठलाही गैरप्रकार शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करताना होणार नाही, अशी ग्वाही दिली. नंतर शेतकरी व काही अडतदार यांच्यात यार्डात चर्चा झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. प्रतिक्रिया आम्हाला टीडीएसच्या नावे वसुली कुणी केली याची माहिती मिळाली. शेतकऱ्यांना आम्ही बोलावले होते. त्यांच्याशी चर्चा केली आणि संबंधित अडतदाराचा परवाना रद्द करण्याची भूमिका मांडली. परंतु शेतकऱ्यांनी नकार दिला. म्हणून आम्ही कारवाई केली नाही. यासंदर्भातील तक्रारदार मोहन भिसे यांनी आमच्याकडे एक तक्रार अर्ज सोमवारी (ता. १७) दिला.  - दिनकर पाटील, सचिव, धुळे बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com