हिंगोली जिल्ह्यात कर्जमाफीच्या रकमेचे हस्तांतरण सुरू

money transfer of loan waiver in Hingoli district started
money transfer of loan waiver in Hingoli district started

हिंगोली : ‘‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शनिवारी (ता. २९) जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील ७२ हजार  ३०५ कर्जखात्यांचा समावेश आहे. रविवार (ता. १) पर्यंत १४ हजार ८८२ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले. आजवर ३३४ शेतकऱ्यांच्या खात्यावर २ कोटी ४१ लाख ८७ हजार ५०६ रुपये एवढी रक्कम हस्तांतरित करण्यात आली’’, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सुधील मेत्रेवार यांनी दिली.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत जिल्ह्यातील १९ बॅंकाच्या शेतकरी सभासदांच्या एकूण १ लाख ६ हजार २५४ कर्जखात्यांपैकी आधार क्रमांक संलग्नित खात्याची संख्या १ लाख २ हजार ८०३ आहे. त्यापैकी  ९७ हजार २३३ कर्जखात्यांची (९१.५० टक्के) माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली. पहिल्या यादीत समगा आणि खरबी या गावांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील २० बॅंकांच्या ७२  हजार ३०५ कर्जखात्यांचा समावेश आहे. त्यांना विशिष्ट क्रमांक मिळाला आहे. असा खातेदार शेतकऱ्यांनी आपले सरकार (सामुदायिक सेवा) केंद्रांवर जाऊन आधार क्रमांकाचे प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. आधार क्रमांकाच्या प्रमाणीकरणानंतर संबंधित खातेदार शेतकऱ्यांना पोच पावती दिली जात आहे. 

आजवर भारतीय स्टेट बॅंकेकडून ६२ लाख  ८ हजार १०७ रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेकडून ४१ लाख ४५ हजार ६७५ रुपये, अलाहाबाद बॅंकेकडून ४७ हजार ९६९ रुपये, बडोदा बॅंकेकडून ५१ लाख ४८ हजार ८४५ रुपये, इंडिया बॅंकेकडून १० लाख ५९ हजार ५४१ रुपये, महाराष्ट्र बॅंकेकडून २ लाख ४८ हजार १३८ रुपये, कॅनरा बॅंकेकडून ३६ हजार ८६१ रुपये, आयसीआयसीआय बॅंकेकडून १ लाख ४१ हजार ५१८ रुपये, पंजाब नॅशनल बॅंकेकडून ४९ हजार १९० रुपये, सिंडीकेट बॅंकेकडून ६ लाख ६३ हजार रुपये, युनियन बॅंकेकडून ६४ लाख ५७ हजार २०६ रुपये अशी एकूण २ कोटी ४१ लाख ८७ हजार ५०६ रुपये ३३४ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्यात आले आहेत, असे मेत्रेवार यांनी सांगितले.

कर्जमाफीची स्थिती

तालुका पोर्टलवर अपलोड कर्जखाती विशिष्ट क्रमांक प्राप्त कर्जखाती
हिंगोली २०६२१ १६२४९
कळमनुरी  १८१६३  १४७५८
वसमत २२५७४   १६१४९
औंढा नागनाथ १६२४१ ११७०९
सेनगाव १९६२३  १३४४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com