Agriculture news in marathi Money transferred to 70,000 accounts from Hingoli Debt Relief | Agrowon

हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार खात्यांवर रक्कम हस्तांतरित

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात आजवर ७० हजार ५०१ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४७९ कोटी ३९ लाख रुपये एवढी रक्कम हस्तांतरित करण्यात आली. १० हजार ६४७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण राहिले आहे.

हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यात आजवर ७० हजार ५०१ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४७९ कोटी ३९ लाख रुपये एवढी रक्कम हस्तांतरित करण्यात आली. १० हजार ६४७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण राहिले आहे.

कर्जमाफीच्या लाभासाठी संबंधित शेतकऱ्यांनी विलंब न लावता आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) सुधीर मेत्रेवार यांनी केले.

या योजनेअंतर्गंत जिल्ह्यातील ९८ हजार ३९९ शेतकऱ्यांची कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. चौथ्या यादी अखेर एकूण ८७ हजार ४८१ शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाला. त्यापैकी ७६ हजार ८३४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घेतले आहे. एकूण १ हजार ५८३ शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी जिल्हा स्तरीय समितीकड़ून ७३६, तर तालुका स्तरीय समितीकडून ४७३ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. तर, २७४ तक्रारी प्रलंबित आहेत. 

जिल्ह्यातील १० हजार ६४७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी आहे. त्यांनी जवळच्या जनसुविधा केंद्रांवर किंवा त्यांच्या संबंधित बँक शाखेस तात्काळ संपर्क करुन त्यांचे आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देणे शक्य होईल. पात्र, शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात पीक कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतील. त्यामुळे तत्काळ आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन मेत्रेवार यांनी केले.

 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...