‘जलशक्ती‘च्या कामांची केंद्रीय पथकाकडून पाहणी

‘जलशक्ती‘च्या कामांची केंद्रीय पथकाकडून पाहणी
‘जलशक्ती‘च्या कामांची केंद्रीय पथकाकडून पाहणी

सांगली : केंद्र शासनामार्फत पाणीटंचाईग्रस्त जिल्ह्यांत जलसंधारणाचे कार्य करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्यातून कवठेमहांकाळ तालुक्याची निवड झाली आहे. या अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची केंद्रीय पथकाकडून पहाणी करण्यात आली, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी यांनी दिली.

जलशक्ती अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात (१ जुलै २०१९ ते १५ सप्टेंबर २०१९ ) मध्ये चालू कामांची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाकडील सहसचिव, उपसचिव, तांत्रिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. पथक हे चालू असलेल्या कामांची दर १५ दिवसांनी ३ वेळा पाहणी करतील. त्या अनुषंगाने द्वितीय तपासणीसाठी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाचे उपसचिव राजू वैद्य व जलशक्ती अभियान मंत्रालय तांत्रिक अधिकारी दौऱ्यावर आले होते. त्यामध्ये त्यांनी तालुकास्‍तरीय सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील आराखड्याबाबतची माहिती घेतली. त्यानुसार आवश्यक त्या सूचना यंत्रणेला दिल्या.

महिला बचत गटाची बैठक घेऊन यामध्ये सहभागी होण्‍याबाबत आवाहन केले. या अभियानांतर्गत कुकटोळी, अलकुड एम, हरोली, आगळगाव, रायवाडी, विठुरायाचीवाडी, खरसिंग, बोरगाव, मळणगाव, नागज या ठिकाणी शोषखड्डा, वृक्षलागवड, छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा संचय, पाझर तलाव, समतल चर इत्यादी कामांची तपासणी केली. अलकुड एममध्‍ये कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित केलेल्‍या मेळाव्‍यात अधिकाधिक शेतकऱ्यांना जलशक्‍ती कामांबाबत मार्गदर्शन केले. या योजनेमध्ये जिल्ह्यास देशात प्रथम क्रमांकावर आणण्याबाबत सर्व विभाग/ यंत्रणानी प्रयत्न करावे, अशा सूचना त्यांच्याकडून देण्यात आल्या.

या अभियानामध्ये सिमेंट बंधारे, पाझर तलाव दुरुस्ती, वृक्ष लागवड, सलग समतल चर, सिमेंट बंधारे दुरुस्ती, नवीन शेततळी बांधणे, शेततळी दुरुस्ती, नाला, ओढ्यामधील गाळ काढणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, शोष खड्डे, विहीर पुनर्भरण, बोअर वेल पुनर्भरण, माती नाला बांध इत्यादी प्रकारची कामे घेण्यात येतील. या अभियानात तालुका कृषी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, नगरपालिका, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, जीएसडीए इत्यादी विभागांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com