मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त
अॅग्रो विशेष
`मोन्सॅन्टोला नुकसानभरपाईचे आदेश हे मानवी हक्काचे उत्तम प्रतीक’
युरोपियन संघ ः मॉन्सॅन्टो या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीच्या राउंडअप (ग्लायफोसेट) तणनाशक वापरामुळे कॅन्सर झाल्याचा शेतकऱ्याचा दावा मान्य करत कॅलिफोर्निया येथील न्यायालयाने १० आॅगस्ट रोजी कंपनीला दंड आणि नुकसानभरपाई म्हणून २८९ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे दोन हजार कोटी) या शेतकऱ्याला देण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीच्या राउंडअपमध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक असल्याचा दावा मान्य करत शेतकऱ्याला नुकसानभरपाईचे आदेश हे मानवी हक्काचे एक उत्तम प्रतीक आहे, असे म्हणत अमेरिकेतील मानवी हक्क तज्ज्ञांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

कॅलिफोर्निया न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे रसायन उत्पादक कंपन्यांची ग्राहकांविषयीची जबाबदारी निश्चित केली आहे, असे अमेरिकेतील मानवी हक्क तज्ज्ञांनी म्हटले आहे. मॉन्सॅन्टोच्या राउंडअपमुळे (ग्लायफोसेट) कॅन्सर झाल्याचा शेतकऱ्याचा दावा न्यायालयाने मान्य केला आहे. ड्वेन जॉन्सून (वय ४६) शालेय मैदानाच्या देखभालीची कामे करत होते. ते मैदानातील तण नियंत्रणासाठी मॉन्सॅन्टोची राउंडअप आणि रेंजर प्रो (ग्लायफोसेट) ही तणनाशके नियमितपणे वापरत. त्यामुळे त्यांना कॅन्सर झाला आणि ते २०२० नंतर जिवंत राहणार नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
‘‘मॉन्सॅन्टोने आपल्या उत्पादनाच्या बॉटलवर कोणत्याही प्रकारचे वॉर्निंग लेबल लावले नसल्याचे न्यायालयाला निदर्शनास आले आहे, त्यामुळे या तणनाशकांच्या व्यापक वापरामुळे टर्मिनल कॅन्सर होतो,’’ असे न्यायालयाने म्हटले आहे.
‘‘ राउंडअपसह ग्लायफोसेटयुक्त तणनाशक आणि कॅन्सर यांचा संबंध आहे. तसेच, कंपनीने आपले उत्पादन वापरत असलेल्या ग्राहकांना याची माहिती देण्याचा जो निष्काळजीपणा केला आहे, त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढला आहे. त्यामुळे हा निर्णय कंपनीची आपल्या ग्राहकांविषयीची जबाबदारी निश्चित करते, तसेच या निकालाला मानवी हक्काचे प्रतीक मानावे लागेल. तसेच, या न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्लायफोसेट तणनाशकामुळे मानवाला कॅन्सर होऊ शकतो या जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्याला पुष्टी दिली आहे.
मॉन्सॅन्टोने ग्लायफोसेट उत्पादन दशकापूर्वी बाजारात आणण्यापूर्वी यामुळे विशेषतः राउंडअपमुळे कॅन्सर होतो हे माहीत असतानाही सत्य लपवून ठेवले आहे,’’ असे अमेरिकेतील मानवी हक्क तज्ज्ञ हिलाल इल्वर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
- 1 of 436
- ››