मॉन्सून विदर्भात दाखल; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही प्रगती

शुक्रवारी (ता.१२) सलग दुसऱ्या दिवशी प्रगती करत मॉन्सूनने विदर्भात, तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे.
मॉन्सून विदर्भात दाखल; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही प्रगती
मॉन्सून विदर्भात दाखल; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही प्रगती

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुरूवारी (ता. ११) महाराष्ट्रात दाखल झाले. शुक्रवारी (ता.१२) सलग दुसऱ्या दिवशी प्रगती करत मॉन्सूनने विदर्भात, तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. मॉन्सूनने बारामती, बीड, वर्ध्यापर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मॉन्सून वाटचालीस पोषक ठरत आहे. गुरूवारी (ता.११) मोठी मजल मारणारे मॉन्सून वारे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील हर्णे बंदर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागापर्यंत पोचले होते. शुक्रवारी (ता.१२) मॉन्सूनने राज्यात आणखी प्रगती केली आहे. तर ईशान्य भारतातील सर्व राज्य व्यापून पुढे चाल करत, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, छत्तीसगडच्या बहुतांशी भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. उद्यापर्यंत (ता. १४) मुंबईसह राज्याच्या उर्वरित भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com