agriculture news in Marathi monsoon advance remain same Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मॉन्सूनची वाटचाल अद्याप जैसे थे 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मे 2020

बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळाली. रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला.

पुणे : बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळाली. रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनने कोणतीही प्रगती केली नाही. मंगळवारी (ता.१९) मॉन्सूनच्या प्रगतीची वाटचाल जैसे थे होती. 

हवामान विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या मॉन्सून आगमानाच्या नवीन वेळापत्रकानुसार नैर्ऋत्य मोसमी वारे २२ मेपर्यंत अंदमान बेटांच्या बहुतांशी भागावर दाखल होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातील ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे पाच दिवस आधीच मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला. तर मंगळवारपर्यंत (ता.१९) आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर दोन दिवसांत मॉन्सूनची कोणतही प्रगती झालेली नाही. 

दरम्यान यंदा केरळातील मॉन्सूनचे आगमन काहीसे लांबणार आहे. यंदा मॉन्सून चार दिवस उशीराने पाच जून रोजी केरळात पोहोचण्याचा अंदाज आहे. तसेच मॉन्सूनचे अंदमानातील आगमनाचा, केरळातील आगमन आणि देशातील पावसाच्या प्रमाणाशी कोणतही परस्पर संबध नसल्याचे हवामान विभागाने आधीच स्पष्ट केले आहे. तर ‘अम्फाम’ चक्रीवादळामुळे प्रभावित झालेले प्रवाह सुरळीत झाल्यानंतर अंदमान बेटांच्या आणखी काही प्रगती होईल असे, हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगितले. 
 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...