Breaking : मॉन्सून अंदमानात दाखल

Breaking : मॉन्सून अंदमानात दाखल
Breaking : मॉन्सून अंदमानात दाखल

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. १८) अंदमानात दाखल झाले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी मॉन्सून अंदमानात पोचला असून, वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वीच दुष्काळाने होरपळणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) ६ जूनला केरळात आगमन होण्याचे पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहे. अंदमान निकोबार बेटसमूहावर १८ किंवा १९ मेपर्यंत मॉन्सून दाखल होण्याचे संकेत दिले होते. यंदा सहा दिवस उशिराने मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार असून, केरळातील आगमनानंतर मॉन्सूनची देशातील पुढील वाटचाल ठरणार आहे.

‘आयएमडी’ने मॉन्सूनच्या आगमनाचे पूर्वानुमान बुधवारी (ता. १५) जाहीर केले. देवभूमी केरळात ६ जूनपर्यंत मॉन्सून दाखल होणार असून, पूर्वानुमानानुसार आगमन अंदाजाच्या ४ दिवस अगोदर किंवा नंतर होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार मॉन्सून साधारणतः २० मे जवळपास अंदमान समुद्र आणि बेटांच्या दक्षिण भागात दाखल होतो. तर १ जूनला केरळमधून मॉन्सूनचे देशात आगमन होते. 

‘आयएमडी’कडून मॉन्सूनच्या केरळातील आगमनाचे पूर्वानुमान २००५ पासून वर्तविण्यात येते. वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्विपकल्पावरील पूर्वमोसमी पावसाची स्थिती, दक्षिण चीन समुद्रातून वातावरणात परावर्तित होणारा किरणोत्सर्ग, आग्नेय हिंद महासागरातील हवेच्या खालच्या थरात वाहणारे वारे, पूर्व विषुववृत्तीय हिंद महासागरातील हवेच्या वरच्या थरात वाहणारे वारे, नैर्ऋत्य प्रशांत महासागरातून वातावरणात परावर्तित होणारा किरणोत्सर्ग हे सहा घटक पूर्वानुमान वर्तविताना विचारात घेतले जातात. 

माॅन्सून आगमन
वर्ष अंदाजित  प्रत्यक्ष
२०१४ ५ जून  ६ जून
२०१५ ३० मे ५ जून
२०१६   ७ जून   ८ जून
२०१७  ३० मे  ३० मे
२०१८  २९ मे २९ मे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com