agriculture news in marathi, Monsoon Advanced in Karnataka | Agrowon

मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चाल
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 जून 2019

पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे थांबलेला नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) उत्तरेकडील प्रवास सुरू झाला आहे. शुक्रवारी (ता. १४) मॉन्सून केरळचा उर्वरीत भाग व्यापून दक्षिण कर्नाटकात दाखल झाला आहे. मॉन्सूनने कर्नाटकातील मंगळूरू, मैसूरपर्यंत मजल मारली आहे, तर तामिळनाडूतील सालेम, कुड्डालोरपर्यंत प्रगती आहे. ईशान्य भारतातील आणखी काही भागात वाटचाल करताना अगरताळापर्यंत मॉन्सून पोचल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे थांबलेला नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) उत्तरेकडील प्रवास सुरू झाला आहे. शुक्रवारी (ता. १४) मॉन्सून केरळचा उर्वरीत भाग व्यापून दक्षिण कर्नाटकात दाखल झाला आहे. मॉन्सूनने कर्नाटकातील मंगळूरू, मैसूरपर्यंत मजल मारली आहे, तर तामिळनाडूतील सालेम, कुड्डालोरपर्यंत प्रगती आहे. ईशान्य भारतातील आणखी काही भागात वाटचाल करताना अगरताळापर्यंत मॉन्सून पोचल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मॉन्सूनची वाटचाल खूपच अडखळत सुरू आहे. आगमनास प्रतिकूल स्थिती असल्याने यंदा केरळात नियमित वेळेच्या तब्बल आठवडाभर उशिराने मॉन्सून केरळात डेरेदाखल झाला. शनिवारी (ता. ८) केरळच्या कोचीसह तमिळनाडूच्या मदुराईपर्यंतची मजल मारली.

दोन दिवसांत किनाऱ्यावर आणखी प्रगती करत कन्नूरपर्यंतचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर सोमवारी (ता. १०) केरळचा बहुतांशी भाग व्यापला होता. मॉन्सून साधारणतः १३ जूनपर्यंत महाराष्ट्रात पोचण्याची शक्यता असतानाच अरबी समुद्रात वायू वादळाची निर्मिती झाली. चक्रीवादळामुळे मॉन्सूनची वाटचाल प्रभावित झाली. तसेच समुद्रावरील बाष्प ओढून घेतल्याने मॉन्सूनचे राज्यातील आगमनही लांबले आहे. ‘वायू’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असल्याने मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे.

इतर अॅग्रो विशेष
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...
कृत्रिम पाऊस : गप्पा अन् गांभीर्यमागील पावसाळ्यातील कमी पावसामुळे राज्यात भीषण...
पेरणीने ओलांडली पन्नाशीः डाॅ. अनिल बोंडेमुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर...
दोषी आढळल्यास विमा कंपन्यांवर गुन्हेः...कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे ः मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग ते कर्नाटक...
दुष्काळी भागातील ‘श्रीमंत’ साकूर आसपास सर्वत्र दुष्काळी परिसर असताना सुशिक्षित व...
पांढऱ्या सोन्याचे काळे वास्तवकेंद्र सरकारने जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरीप...
‘जीआय’ला प्रोत्साहन राज्यासाठी वरदानकेंद्र सरकारचा २०१९ चा अंतिम अर्थसंकल्प   ...
कृत्रिम पावसाचा मंगळवारी तीन ठिकाणी...मुंबई   ः पश्चिम महाराष्ट्रातील...
क्षारप्रतिकारक ऊस वाणावर होणार संशोधनपुणे  : भाभा अणुशक्ती केंद्र (बीआरसी) आणि...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची...पुणे  : बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (...
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...