agriculture news in marathi, Monsoon advanced in Konkan, kolhapur | Agrowon

मॉन्सून एक्सप्रेस कोकणात दाखल; कोल्हापूरपर्यंत मजल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे आगमन लांबलेल्या मॉन्सूनची प्रतिक्षा अखेर संपली आहे. मॉन्सूनने गुरूवारी (ता.२०) कोकणात दमदार हजेरी लावत रत्नागिरी, कोल्हापूरपर्यंत मजल मारली आहे. मॉन्सून दाखल झाल्यानंतर उद्यापासून (ता. २२) सुर्याचा आर्दा नक्षत्रात प्रवेश होत असून, वाहन हत्ती असल्याने जाेरदार पावसाचा अंदाज असून, दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा मिळणार आहे.

पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे आगमन लांबलेल्या मॉन्सूनची प्रतिक्षा अखेर संपली आहे. मॉन्सूनने गुरूवारी (ता.२०) कोकणात दमदार हजेरी लावत रत्नागिरी, कोल्हापूरपर्यंत मजल मारली आहे. मॉन्सून दाखल झाल्यानंतर उद्यापासून (ता. २२) सुर्याचा आर्दा नक्षत्रात प्रवेश होत असून, वाहन हत्ती असल्याने जाेरदार पावसाचा अंदाज असून, दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा मिळणार आहे.

अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. वादळ निवळल्यानंतरही अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह मंदच असल्याचे दिसून आले आहे. मॉन्सूनने अपेक्षित चाल केली नसून, महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत (ता.२१) लांबण्याची यापुर्वीच वर्तविली होती. मॉन्सूनने १४ जून रोजी दक्षिण कर्नाटकपर्यंतची वाटचाल पुर्ण केली असून, बुधवारीदेखील(ता.१९) प्रगतीची सीमा कायम होती. रविवारी (ता. १६) पुर्व भारतात पोचलेल्या मॉन्सूनने प्रगती केलेली नाही. शुक्रवारी मॉन्सूनची आगमनाची वर्दी मिळाली आहे.

शनिवारपर्यंत (ता. २२) बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. वाढलेले वाऱ्याचे प्रवाह, समुद्राला उधाण येऊ लागले आहे. यातच किनारपट्टीय भागात ढगांची दाटी झाली असून, कोकणात पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात पावसाने जोर धरला आहे. तर रविवारपासून (ता. २३) मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे.

इतर बातम्या
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
जळगाव : पीकविम्याचा केवळ २० हजार...जळगाव ः शासनाकडून शेतकऱ्यांना पीकविम्याची सक्ती...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
कोल्हापुरात पीकविमा योजनेकडे...कोल्हापूर : पंतप्रधान पीकविमा योजनेकडे...
संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी...मंगळवेढा, जि. सोलापूर : रत्नागिरी-नागपूर...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून ६८ हजार...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत यंदाच्या...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
शेती अवजारांसाठी लाभार्थी शेतकऱ्यांची...नगर ः ‘उन्नत शेती - समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत...
पावसाने उघडीप दिल्याने भात लागवडी...पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील मावळ,...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
सातारा जिल्हा बँक पीक कर्जवाटप...सातारा : जिल्ह्यात पुन्हा एखादा राष्ट्रीयीकृत...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा सुरू जळगाव ः शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची...
लहान व्यावसायिकांना मिळणार महावितरणच्या...सोलापूर : महावितरणने वीजबिल भरण्यासाठी ‘...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...
सोलापुरात विधानसभेसाठी २५ हजार अधिकारी...सोलापूर : विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठीच्या...