राज्यात पावसाचा जोर वाढणार

राज्यात पावसाचा जोर वाढणार
राज्यात पावसाचा जोर वाढणार

पुणे : कोकण किनारपट्टीबरोबरच मध्य महाराष्ट्रातही मॉन्सूनने बरसण्यास सुरवात केली आहे. अाजपासून (ता. ५) राज्यात सर्वदूर पाऊस सुरू होणार असून, काही ठिकाणी जोर वाढण्याची शक्यता आहे. तर, रविवारपर्यंत (ता. ८ जुलै) कोकणात अतिवृष्टीचा, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी (ता. ४) कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला, पेण येथे सर्वाधिक १९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.   उत्तर महाराष्ट्राच्या किनाऱ्यापट्टीपासून केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा, गुजरात परिसरात ५.८ किलोमीटर उंचीवर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीसह, उत्तर महाराष्ट्रात दाट ढग गोळा झाले असून, पावसाला सुरवात झाली आहे. मॉन्सूनचा अास असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला असून, तो दक्षिणेकडे येण्यास पोषक स्थिती निर्माण होत आहे. यामुळे राज्यात पाऊस स.िक्रय होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. बुधवारी सकाळपर्यंत कोकणात बहुतांशी ठिकाणी पाऊस पडला असून, अनेक ठिकाणी ९० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. तर, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.    बुधवारी (ता.४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये|स्त्रोत कृषी विभाग)

  • कोकण : ठाणे १४८, बलकुम ९०, मुंब्रा १०२, दहिसर ११०, बेलापूर १८०, कल्याण ६६, टिटवाळा ६३, ठाकुरली ६३, नडगाव ६१, भिवंडी ९५, अंगाव ६९, डिघशी ६१, खारबाव १००, उल्हासनगर ७१, कुमभर्ली १०८, बदलापूर ८९, अलिबाग ७०, पोयनड १३४, किहीम ९७, सरल ८७, चरी ११७, रामरज ६८, पनवेल ७९, ओवले ९५, करनाळा ९९, तलोजे १०५, खालापूर चौक ७६, पेण १९०, हमरापूर ८१, वाशी ११२, कसू ११३, कामरली १२५, नाटे ६५, गोरेगाव ६२, नागोठणे ८६, श्रीवर्धन ६८, बोरलीपंचटण ७२, वाहल ९०, सावरडे १६३, असुरडे ९५, शिरगाव १२३, मुरडव ७४, माखजन ८४, फुंगुस ७२, तेरहे ६४, सवंडल ७५, पाचल १२३, लांजा ६७, भांबेड ८५, विलवडे ७२, कणकवली ६६, सांगवे ७६, वागडे ६५, वसई ११२, मांडवी ११४, अगशी ११५, निर्मल १०७, विरार ८०, मानिकपूर १४२, वाडा ६१, कडूस ६५, कोणे ६१, कांचगड ८१, डहाणू ९८, साइवन ७३, कसा ९२, चिंचणी १९७, पालघर १०२, मनोर १६८, बोयसर १०४, सफला ११२, अगरवाडी ११०, तारापूर ९६, जव्हार ७५, साखर ६५, विक्रमगड ८५, तलवड १४०.
  • मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ४५, धारगाव ५६, शेंडी ७४,  पौड ४३, माले ७६, मुठे ५९, भोलावडे ६५, कार्ला ४८, लोणावळा ९८, वेल्हा ४२, विंझर ४४, राजूर ४८, डिंगाेरे ४२, बामणोली ५९, केळघर ५५, हेळवाक ८८, महाबळेश्‍वर ४०, करंजफेन ६७, मलकापूर ४४, कसबा ४२, साळवण ७२, गवसे ४०, हेरे ४१. 
  • विदर्भ : बडनेरा २०, दवरगाव ३२, धापेवडा २१, भिवापूर २९, धारगाव २२, आकोडी २३, विरली २१, कामठा २२. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com