मॉन्सूनचा देशाला निरोप

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा निरोप घेतला आहे. सोमवारी (ता. २५) संपूर्ण देशातून मॉन्सून परतल्याचे, तसेच दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
Monsoon bids farewell to the country
Monsoon bids farewell to the country

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा निरोप घेतला आहे. सोमवारी (ता. २५) संपूर्ण देशातून मॉन्सून परतल्याचे, तसेच दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. देशात दाखल झाल्यानंतर तब्बल ४ महिने २२ दिवस मुक्काम करून मॉन्सून माघारी परतला आहे.

यंदा नियमित वेळेच्या दोन दिवस उशिराने (ता. ३ जून) देवभूमी केरळमध्ये दाखल झालेल्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास ही उशिराने झाला आहे. मॉन्सूनने तब्बल १० दिवस उशिराने देशाचा निरोप घेतला आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार १५ ऑक्टोबर ही मॉन्सूनची देशातून माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख आहे.

यंदा २३ जुलै रोजी देश व्यापणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) परतीची वाटचाल पाहता यंदा तब्बल १९ दिवस उशिराने मॉन्सूनने ६ ऑक्टोबर रोजी राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू केला. तर १४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून मॉन्सून परतल्याचे जाहीर करण्यात आले. राज्यात दाखल झाल्यानंतर तब्बल ४ महिने ९ दिवस मुक्काम करून मॉन्सून महाराष्ट्रातून परतला. त्यानंतर दक्षिण भारतातील मॉन्सूनचा परतीचा प्रवास काहीसा उशिराने झाला. 

शनिवारी (ता. २३) देशाच्या बहुतांशी भागातून माघार घेतली. सोमवारी (ता. २५) मॉन्सूनने संपूर्ण देशाचा निरोप घेतला असून, दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com