agriculture news in Marathi, monsoon cover all Maharashtra, Maharashtra | Agrowon

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत व्यापले राज्य...
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 जून 2019

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. २५) मंबईसह राज्याचा सर्व भागांत दाखल होत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. यंदा महाराष्ट्रातील आगमन उशिराने होत १९७२ नंतर उशिरा २० जून रोजी मॉन्सून तळकोकणात पोचला. त्यानंतर वेगाने वाटचाल करत पाच दिवसांत राज्य व्यापले. मॉन्सूनने आपले टप्पे पार केल्यानंतर वाऱ्यांची दिशानिश्चित होऊन सप्टेंबरपर्यंत पावसाचे यामार्गाखाली प्रदेशात नैसर्गिक वितरण होते.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. २५) मंबईसह राज्याचा सर्व भागांत दाखल होत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. यंदा महाराष्ट्रातील आगमन उशिराने होत १९७२ नंतर उशिरा २० जून रोजी मॉन्सून तळकोकणात पोचला. त्यानंतर वेगाने वाटचाल करत पाच दिवसांत राज्य व्यापले. मॉन्सूनने आपले टप्पे पार केल्यानंतर वाऱ्यांची दिशानिश्चित होऊन सप्टेंबरपर्यंत पावसाचे यामार्गाखाली प्रदेशात नैसर्गिक वितरण होते.

साधारणतः १५ जून रोजी राज्य व्यापणाऱ्या मॉन्सूनला यंदा १० दिवस उशीर झाला. राज्यात दाखल होताच मॉन्सूनने वेगाने वाटचाल केली. गुरुवारी (ता. २०) कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोचणाऱ्या मॉन्सूनचा उत्तरेकडे मजल दरमजल प्रवास सुरूच आहे. रविवारी (ता. २३) मॉन्सूनने मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा काही भाग, मराठवाड्याचा बहुतांशी भाग व्यापला. सोमवारी (ता. २४) मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापला, तर कोकण वाटचाल रेंगाळलेल्या मॉन्सूनने चार दिवसांनंतर वाटचाल करत अलिबागपर्यंत धाव घेतली. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, मालेगावपर्यंत मॉन्सूनने मजल गाठली होती. मॉन्सूनने मंगळवारी दक्षिण गुजरात, मध्य प्रदेशच्या आणखी काही भागांपर्यंतचा टप्पा पूर्ण केला आहे.

यंदा सुरवातीपासूनच मॉन्सूनची वाटचाल खूपच अडखळत सुरू आहे. १८ मे रोजी अंदमानात पोचलेल्या मॉन्सूनने तब्बल आठवडाभरानंतर २५ मे रोजी थोडीशी चाल केली. ३० मे रोजी मॉन्सूनने संपर्ण अंदमान व्यापून, अरबी समुद्राकडे वाटचाल केली. ५ जून रोजी श्रीलंका देशाचा जवळपास निम्मा भाग व्यापला. तर तब्बल आठवडाभर उशिराने ८ जून देवभूमी केरळात डेरेदाखल झाला. त्यानंतर १० जून मॉन्सूनने केरळच्या बहुतांशी भागांत मजल मारली. याच दरम्यान अरबी समुद्रात तयार झालेल्या अतितीव्र ‘वायू’ चक्रीवादळाने मॉन्सूनची वाटचाल रोखून धरली. १४ जून रोजी दक्षिण कर्नाटकातील मंगळूरू, मैसूरपर्यंतचा पट्टा मॉन्सूनने पूर्ण केला होता.
 

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...