agriculture news in Marathi, Monsoon cover Marathwada and Vidarbha, Maharashtra | Agrowon

मॉन्सूनने मराठवाडा, विदर्भ व्यापला
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 जून 2019

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. २४) संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व्यापला; तर कोकण वाटचाल रेंगाळलेल्या मॉन्सूनने चार दिवसांनंतर वाटचाल करत अलिबागपर्यंत धाव घेतली. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, मालेगावपर्यंत मॉन्सून पोचला आहे. बुधवारपर्यंत (ता. २६) मॉन्सून मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागासह संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. २४) संपूर्ण मराठवाडा, विदर्भ व्यापला; तर कोकण वाटचाल रेंगाळलेल्या मॉन्सूनने चार दिवसांनंतर वाटचाल करत अलिबागपर्यंत धाव घेतली. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, मालेगावपर्यंत मॉन्सून पोचला आहे. बुधवारपर्यंत (ता. २६) मॉन्सून मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागासह संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने वाटचाल सुरू केली आहे. गुरुवारी (ता. २०) कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोचणाऱ्या मॉन्सूनचा मजल दरमजल प्रवास सुरूच आहे. रविवारी (ता. २३) मॉन्सूनने मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा आणखी काही भाग, मराठवाड्याचा बहुतांशी भाग व्यापला. त्यानंतर सोमवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हजेरी लावत अलिबाग, मालेगावपर्यंतचा टप्पा गाठला. 

केरळात यंदा आठवडाभर उशिराने आलेल्या मॉन्सूनच्या वाटचालीवर अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे परिणाम झाला. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावलाच, तसेच बाष्प ओढून नेल्याने पाऊसही लांबला. महाराष्ट्रातील आगमन उशिराने होत १९७२ नंतर यंदा सर्वांत उशिरा २० जून रोजी मॉन्सून तळकोकणात पोचला. त्यानंतर मात्र मॉन्सूनचा उत्तरेकडील प्रवास वेगाने होत आहे. 

इतर अॅग्रो विशेष
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...