मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली; गोव्याच्या उंबरठ्यावर

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरूवारी (ता.४) पश्चिम किनारपट्टीवर वाटचाल करत, संपूर्ण केरळ व्यापला आहे. तर कर्नाटक राज्याची संपूर्ण किनारपट्टी व्यापत कारवार, हसनपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
monsoon
monsoon

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरूवारी (ता.४) पश्चिम किनारपट्टीवर वाटचाल करत, संपूर्ण केरळ व्यापला आहे. तर कर्नाटक राज्याची संपूर्ण किनारपट्टी व्यापत कारवार, हसनपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. मॉन्सून वारे जवळपास गोव्याच्या प्रवेशद्वारावर पोचले आहे. रविवारपर्यंत (ता.७) कर्नाटक, तामिळनाडूच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक स्थिती आहे. अरबी समुद्रात असलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे वाऱ्यांना खेचून आणल्याने मॉन्सून नियमित वेळेवर १ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. मॉन्सूनने सोमवारी (ता.१) केरळच्या कन्नूर, तामिळनाडूच्या कोईम्मतूर, कन्याकुमारीपर्यंतचा भाग व्यापला होता. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत जाताना किनारपट्टीलगत मॉन्सूनची आणखी वाटचाल केली आहे. गुरुवारी (ता.४) केरळ, कोमोरीनचा सर्व भाग, श्रीलंका व दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, कर्नाटकसह आणि मध्य अरबी समुद्राच्या काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. ‘निसर्ग’मुळे मॉन्सून वाऱ्यांवर प्रभाव पडला आहे. पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनने प्रगती केली असली तरी अंतर्गत भागात मात्र मॉन्सून दाखल झालेला नाही. वादळ जमिनीवर येऊन निवळल्यानंतर वाऱ्याचे प्रवाह हळूहळू सुरळीत होऊन, अंतर्गत भागात प्रगतीची होणार आहे. रविवारपर्यंत (ता. ७) कर्नाटक, तामिळनाडू, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com