agriculture news in Marathi monsoon covers state Maharashtra | Agrowon

मॉन्सूनने ओलांडली राज्याची सीमा 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 जून 2021

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) प्रवास वेगाने सुरू झाला आहे. मुंबईत मॉन्सून दाखल झाल्यानंतर गुरुवारी (ता. १०) संपूर्ण महाराष्ट्र व्यापून उत्तरेकडे कूच केली आहे.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) प्रवास वेगाने सुरू झाला आहे. मुंबईत मॉन्सून दाखल झाल्यानंतर गुरुवारी (ता. १०) संपूर्ण महाराष्ट्र व्यापून उत्तरेकडे कूच केली आहे. गुजरातच्या दक्षिण भागातील सुरत, तेलंगणा, मध्य प्रदेशाचा दक्षिण भाग व परिसर, छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशापर्यंत मजल मारली आहे. पुढील एक ते दोन दिवसांत आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. 

साधारणपणे मॉन्सून राज्यात ३ जून रोजी दाखल झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अलिबाग, पुणे, सोलापूर, उस्नानाबादपर्यंत वाटचाल केली होती. त्यानंतर दोन दिवस वाऱ्याचा वेग मंदावला होता. बुधवारी (ता. ९) मॉन्सूनने पुन्हा वेगाने वाटचाल सुरू केली असून, मुंबईसह संपुर्ण कोकण, मालेगाव, मराठवाडासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भात नागपूरपर्यंतचा बहुतांशी भाग व्यापला होता.

गुरुवारीही मॉन्सूनने चांगलीच प्रगती केल्यानंतर राज्यातील सर्वच भाग व्यापून उत्तरेकडे वेगाने सरकला आहे. त्यामुळे मंगळवारच्या मध्यरात्रीपासून राज्यातील बहुतांशी भागांत जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईतही दोन दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली असून, अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. 

सध्या मॉन्सूनला उत्तरेकडे सरकण्यासाठी पोषक वातावरण आहे. पुढील दोन दिवसांत गुजरातचा अनेक भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या अनेक भागांत दाखल होईल. तसेच पश्‍चिम बंगाल आणि झारखंड तसेच बिहारच्या काही भागांत, पूर्व उत्तर प्रदेशाच्या भागात मॉन्सून दाखल होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे उत्तर भागातील अनेक भागांत वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
निर्यातीसाठी संत्रा आंबटच!  सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...
हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात...नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी...
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...