agriculture news in Marathi monsoon on the door of Goa Maharashtra | Agrowon

मॉन्सून गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जून 2020

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता.६) दक्षिण कर्नाटक आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागात प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. गुरूवारी (ता.४) पश्चिम किनारपट्टीवर वाटचाल करत, संपूर्ण केरळ व्यापला आहे.

पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी (ता.६) दक्षिण कर्नाटक आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागात प्रगती केल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. गुरूवारी (ता.४) पश्चिम किनारपट्टीवर वाटचाल करत, संपूर्ण केरळ व्यापला आहे. कर्नाटक राज्याची संपूर्ण किनारपट्टी व्यापून मॉन्सून वारे गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाले आहे. आज दक्षिण कर्नाटकात वारे दाखल झाले असले तरी पश्‍चिम किनारपट्टीवरील वाटचाल जैसे थे आहे.  

अरबी समुद्रात असलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे मॉन्सून वाऱ्यांचे प्रवाह प्रभावित होऊन १ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. देशाच्या मुख्य भूमीवर आगमन होताच, गुरुवारी (ता.४) केरळचा कोमोरीनचा सर्व भाग, श्रीलंका व दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, कर्नाटक किनारपट्टीवरील कारवार, हसनपर्यंत आणि मध्य अरबी समुद्राच्या काही भागात मॉन्सून दाखल झाले. शनिवारी दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडूच्या सालेमपर्यंत मजल मारली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.    

‘निसर्ग’मुळे मॉन्सून वाऱ्यांवर प्रभाव पडल्याने पश्चिम किनारपट्टीवर मॉन्सूनने प्रगती केली. कर्नाटक तामिळनाडूच्या अंतर्गत भागात मात्र मॉन्सून दाखल झालेला नव्हता. वादळ जमिनीवर येऊन निवळल्यानंतर वाऱ्याचे प्रवाह सुरळीत होऊ लागले असून, शनिवारी कर्नाटक, तामिळनाडूच्या अंतर्गत भागासह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात वाटचाल केली आहे. सोमवारपर्यंत तमिळनाडूच्या उर्वरित भागासह, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत
बंगालच्या उपसागरात आलेले ‘अम्फान’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. आता निसर्ग चक्रीवादळ निवळते तोच बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहे. उद्या (ता.८) उपसागराच्या पूर्वमध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, त्याची तीव्रता वाढण्याची अंदाज आहे. यामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


इतर अॅग्रो विशेष
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...