Breaking : मॉन्सून एक्सप्रेस केरळात दाखल..!

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता.१) देवभुमी केरळमध्ये दाखल झाले, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिली आहे.
Monsoon Onset over Kerala, मॉन्सून, केरळ, महाराष्ट्र, पाऊस
Monsoon Onset over Kerala, मॉन्सून, केरळ, महाराष्ट्र, पाऊस

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता.१) देवभुमी केरळमध्ये दाखल झाले, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिली आहे. मॉन्सूनचे आगमन यंदा लांबण्याची शक्यता असताना, अरबी समुद्रात असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सून वेळेवर केरळमध्ये धडकला आहे. दरम्यान आज दुपारी २.१५ वाजता भारतीय हवामान विभाग देशातील मॉन्सूनचा सविस्तर अंदाज आज देणार आहेत. 

यंदा मॉन्सून सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशिराने म्हणजेच पाच जून रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. यात चार दिवसांची मागे पुढे तफावतही गृहीत धरण्यात आली होती. परंतू, पूर्व-मध्य अरबी समुद्रात रविवारी (ता.३१) तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राने वाऱ्यांना खेचून आणल्याने मॉन्सून नियमित वेळवर १ जून केरळमध्ये दाखल होईल, असे हवामान विभागाने जाहीर केले. त्यानुसार सोमवारी मॉन्सून केरळात दाखल झाला आहे. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, केरळमध्ये पाऊस पडत आहे, कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. कमी दाब क्षेत्र उत्तरेकडे सरकत जाताना त्याचे वादळात रूपांतर होणार असल्याने किनारपट्टीलगत मॉन्सूनची आणखी वाटचाल होण्याची शक्यता आहे.   दरम्यान बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे यंदा वेळेआधीच १७ मे रोजी मॉन्सून अंदमान, निकोबार बेटांवर दाखल झाला होता. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर तब्बल दहा दिवस दक्षिण दक्षिण अंदमानातच मॉन्सून अडखळला. उपसागरातील वाटचाल पुन्हा सुरू करत, गुरूवारी (ता.२८) दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने संपूर्ण अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात धडक दिली होती. तर भारताच्या दक्षिणेकडे असलेल्या श्रीलंकेच्या दक्षिण भागासह, मालदीव आणि कोमोरीन भागातही मॉन्सून वारे दाखल झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com