agriculture news in marathi Monsoon Onset on kerala : IMD | Agrowon

Breaking : मॉन्सून एक्सप्रेस केरळात दाखल..!

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 जून 2020

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता.१) देवभुमी केरळमध्ये दाखल झाले, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिली आहे.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता.१) देवभुमी केरळमध्ये दाखल झाले, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिली आहे. मॉन्सूनचे आगमन यंदा लांबण्याची शक्यता असताना, अरबी समुद्रात असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सून वेळेवर केरळमध्ये धडकला आहे.

दरम्यान आज दुपारी २.१५ वाजता भारतीय हवामान विभाग देशातील मॉन्सूनचा सविस्तर अंदाज आज देणार आहेत. 

यंदा मॉन्सून सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशिराने म्हणजेच पाच जून रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. यात चार दिवसांची मागे पुढे तफावतही गृहीत धरण्यात आली होती. परंतू, पूर्व-मध्य अरबी समुद्रात रविवारी (ता.३१) तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राने वाऱ्यांना खेचून आणल्याने मॉन्सून नियमित वेळवर १ जून केरळमध्ये दाखल होईल, असे हवामान विभागाने जाहीर केले. त्यानुसार सोमवारी मॉन्सून केरळात दाखल झाला आहे. अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली असून, केरळमध्ये पाऊस पडत आहे, कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. कमी दाब क्षेत्र उत्तरेकडे सरकत जाताना त्याचे वादळात रूपांतर होणार असल्याने किनारपट्टीलगत मॉन्सूनची आणखी वाटचाल होण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे यंदा वेळेआधीच १७ मे रोजी मॉन्सून अंदमान, निकोबार बेटांवर दाखल झाला होता. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर तब्बल दहा दिवस दक्षिण दक्षिण अंदमानातच मॉन्सून अडखळला. उपसागरातील वाटचाल पुन्हा सुरू करत, गुरूवारी (ता.२८) दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने संपूर्ण अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात धडक दिली होती. तर भारताच्या दक्षिणेकडे असलेल्या श्रीलंकेच्या दक्षिण भागासह, मालदीव आणि कोमोरीन भागातही मॉन्सून वारे दाखल झाले होते.


इतर बातम्या
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
नवापूर तालुक्यात भातासह कापूस, ज्वारीची...नवापूर, जि.नंदुरबार  ः नवापूर तालुक्यात...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख ...मुंबई: कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
सारंगखेडा प्रकल्पाग्रस्तांना मोबदल्याची...नंदुरबार  ः जिल्ह्यात तापी नदीवरील सारंगखेडा...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
रेल्वेस्थानकावर नागपुरी संत्रा विक्रीला...वर्धा ः नागपूर हे मध्य भारतातील महत्त्वाचे...