agriculture news in marathi Monsoon onset in Maldive and andaman, will reach on 1st june in Kerala : IMD | Page 2 ||| Agrowon

मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत केरळात

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 मे 2020

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत (ता.१) केरळमध्ये दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचे भारतीय हवामान विभागाने गुरूवारी (ता.२८) जाहीर केले आहे.

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत (ता.१) केरळमध्ये दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचे भारतीय हवामान विभागाने गुरूवारी (ता.२८) जाहीर केले आहे. मॉन्सूनने अंदमान, निकोबार बेट समूहाच्या सर्व भागात मजल मारली आहे. तर अरबी समुद्रातील मालदीव आणि कोमोरीनच्या काही भागासह, श्रीलंकेच्या दक्षिण भागातही मॉन्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

यंदा मॉन्सून सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशिराने म्हणजेच पाच जून रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. यात चार दिवसांची मागे पुढे तफावतही गृहीत धरण्यात आली होती. मात्र पूर्व-मध्य अरबी समुद्रात रविवारपर्यंत (ता.३१) नवीन कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे कमी दाब क्षेत्र उत्तरेकडे सरकत जाताना अधिक तीव्र होणार आहे. या प्रणालीमुळे मॉन्सून वारे खेचून आणण्यास पोषक स्थिती तयार होत असल्याने १ जून रोजी मॉन्सून केरळात दाखल होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे १७ मे रोजी मॉन्सून अंदमान, निकोबार बेटांवर दाखल झाला होता. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर तब्बल दहा दिवस दक्षिण दक्षिण अंदमानातच मॉन्सून अडखळला. बुधवारी (ता.२७) मॉन्सूनची वाटचाल पुन्हा सुरू झाली. त्यानंतर गुरूवारी (ता.२८) दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने संपूर्ण अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात धडक दिली. तर भारताच्या दक्षिणेकडे असलेल्या मालदीव आणि कोमोरीन भागातही मॉन्सून वारे दाखल झाले आहेत. उद्यापर्यंत (ता.३०) मालदीव कोमोरीन बेटांच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

कमी दाबाचे क्षेत्र होतेय तीव्र
अरबी समुद्राच्या पश्‍चिम-मध्य भागात गुरूवारी (ता.२८) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. शनिवारपर्यंत (ता.३०) हे कमीदाब क्षेत्र अधिक तीव्र होणार आहे. रविवारपर्यंत (ता.३१) ही प्रणाली दक्षिण ओमान, आणि पूर्व येमेनच्या किनाऱ्याकडे सरकून जमिनीवर जाणार आहे. त्याचवेळी अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.


इतर बातम्या
सीईटीऐवजी गुणांद्वारे कृषी...अमरावती ः बारावीनंतर कृषी अभ्यासक्रमाला...
वीजबिले माफ न केल्यास कंपनीचे कार्यालय...बुलडाणा ः लॉकडाउनच्या काळातील तीन महिन्यांचे...
सत्तास्थापनेसाठी भाजपकडूनच विचारणा केली...मुंबई : सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तास्थापन...
वऱ्हाडात दूधाचे दर स्थिरअकोला ः या भागातील दूध संघ डबघाईस आल्याने दूध...
वाशीम जिल्ह्यावर खरिपात पावसाची कृपावाशीम ः जिल्ह्यात यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत...
वर्धा जिल्ह्यात दूध उत्पादकांना दराचा...नागपूर ः लॉकडाउनमुळे मागणी घटल्याचे सांगत खासगी...
नाशिकमध्ये कमी दूध दरामुळे उत्पादकांची...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार...
वीज बिले माफ न केल्यास उद्रेक ः...नाशिक : लॉकडाऊन काळात वीज कंपन्यांनी घरगुती वीज...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश;तरीही चार...पुणे: पंतप्रधान पॅकेजमधून राबविण्यात आलेल्या...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...
दूध व्यवसाय झाला आतबट्ट्याचा; शेतकरी...पुणेः मागील काही वर्षांपासून संकटात असलेल्या दूध...
राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता पुणे : मॉन्सून सक्रिय होण्याचा पोषक हवामान होत...
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...