agriculture news in marathi, monsoon prediction, pune, maharashtra | Agrowon

अंदमानात १८ मेपर्यंत मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 मे 2019

पुणे   ः  दुष्काळाने होरपळणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) ६ जूनला केरळात आगमन होण्याचे पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहे. अंदमान निकोबार बेटसमूहावर १८ किंवा १९ मेपर्यंत मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले आहे. यंदा सहा दिवस उशिराने मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार असून, केरळातील आगमनानंतर मॉन्सूनची देशातील पुढील वाटचाल ठरणार आहे.

पुणे   ः  दुष्काळाने होरपळणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) ६ जूनला केरळात आगमन होण्याचे पूर्वानुमान भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहे. अंदमान निकोबार बेटसमूहावर १८ किंवा १९ मेपर्यंत मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले आहे. यंदा सहा दिवस उशिराने मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार असून, केरळातील आगमनानंतर मॉन्सूनची देशातील पुढील वाटचाल ठरणार आहे.

‘आयएमडी’ने मॉन्सूनच्या आगमनाचे पूर्वानुमान बुधवारी (ता. १५) जाहीर केले. देवभूमी केरळात ६ जूनपर्यंत मॉन्सून दाखल होणार असून, पूर्वानुमानानुसार आगमन अंदाजाच्या ४ दिवस अगोदर किंवा नंतर होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार मॉन्सून साधारणतः २० मे जवळपास अंदमान समुद्र आणि बेटांच्या दक्षिण भागात दाखल होतो. तर १ जूनला केरळमधून मॉन्सूनचे देशात आगमन होते. 

‘आयएमडी’कडून मॉन्सूनच्या केरळातील आगमनाचे पूर्वानुमान २००५ पासून वर्तविण्यात येते. वायव्य भारतातील किमान तापमान, दक्षिण द्विपकल्पावरील पूर्वमोसमी पावसाची स्थिती, दक्षिण चीन समुद्रातून वातावरणात परावर्तित होणारा किरणोत्सर्ग, आग्नेय हिंद महासागरातील हवेच्या खालच्या थरात वाहणारे वारे, पूर्व विषुववृत्तीय हिंद महासागरातील हवेच्या वरच्या थरात वाहणारे वारे, नैर्ऋत्य प्रशांत महासागरातून वातावरणात परावर्तित होणारा किरणोत्सर्ग हे सहा घटक पूर्वानुमान वर्तविताना विचारात घेतले जातात. 

दरम्यान, बंगालच्या उपसागरात आलेल्या फणी तीव्र चक्रीवादळामुळे बदलेले वाऱ्याचे प्रवाह सुरळीत होऊन मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती तयार होण्यासाठी कालावधी लागल्याने मॉन्सूनचे आगमन लांबण्याचे संकेत काही हवामान तज्ज्ञ व्यक्त करत होते. पूर्वमोसमी पावसासाठी आवश्यक स्थितीनुसार साधारणतः २१ एप्रिल दरम्यान केरळ जवळच्या समुद्रात ढग जमा होऊन ते पूर्वेकडे सरकण्यास सुरवात होते. मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तविताना ही स्थिती विचारात घेतली जाते.

यंदा १० दिवस उशिराने स्थिती निर्माण झाली असल्याने यंदा मॉन्सूनचे आगमन आठवडाभर लांबण्याची शक्यता वर्तविली जात होती. यातच मॉन्सून दाखल होण्यास उशीर होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. केरळमध्ये ६ जूनला मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर पाच दिवसांनी तो महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

माॅन्सून आगमन
वर्ष अंदाजित  प्रत्यक्ष
२०१४ ५ जून  ६ जून
२०१५ ३० मे ५ जून
२०१६   ७ जून   ८ जून
२०१७  ३० मे  ३० मे
२०१८  २९ मे २९ मे

 

इतर अॅग्रो विशेष
सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक...अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ...
लष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी...पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी...
खानदेशातही कापसावर लष्करी अळीजळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील...
विधानसभेचा बिगुल वाजलामुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे...
कांदा दरस्थिती आढाव्यासाठी केंद्राचे...नाशिक : कांदा दर, आवक स्थितीचा आढावा...
पापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...
बाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...
अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...
नावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...
औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...
कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक...
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
पावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव  ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...
नागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्‍यावरील अमेरिकन लष्करी...
राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः  कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...
श्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...
शेतकऱ्यांच्या ‘महारोषा’चे काय?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...