agriculture news in marathi, monsoon prediction, pune, maharashtra | Agrowon

मॉन्सून आज कोकणात?
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

कोकणात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत असून, मॉन्सूनच्या आगमनाची स्थिती तयार झाली आहे. मॉन्सून आज (ता. २०) कोकणच्या दक्षिण भागात पोचण्यास शक्यता आहे. अन्यथा उद्या (ता. २१) मॉन्सून नक्कीच कोकणात धडक देईल. पुण्यातही मॉन्सूनला पोषक स्थिती होत असून, २३ जून रोजी पुण्यात मॉन्सूनचे आगमन शक्य आहे.
- डॉ. अनुपम कश्यपी, प्रमुख, हवामान विभाग, पुणे

पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे आगमन लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले असून, समुद्राला उधाणही येऊ लागल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनच्या आगमनाला ही स्थिती पूरक ठरल्याने आज (गुरुवारी) किंवा उद्या (शुक्रवारी) मॉन्सून दक्षिण कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोनच दिवसांत मॉन्सून पुण्यासह राज्याच्या आणखी काही भागात प्रगती करण्यास पोषक हवामान आहे. 

अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. वादळ निवळल्यानंतरही अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह मंदच असल्याचे दिसून आले आहे. मॉन्सूनने अपेक्षित चाल केली नसून, महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत (ता. २१) लांबण्याची यापूर्वीच वर्तविली होती. मॉन्सूनने १४ जून रोजी दक्षिण कर्नाटकपर्यंतची वाटचाल पूर्ण केली असून, बुधवारीदेखील (ता. १९) प्रगतीची सीमा कायम होती. रविवारी (ता. १६) पूर्व भारतात पोचलेल्या मॉन्सूनने प्रगती केलेली नाही. आता मॉन्सूनच्या आगमनास बळकटी मिळाली आहे. 

बुधवारी (ता. १९) उत्तर मध्य प्रदेश आणि दक्षिण उत्तर प्रदेश परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. तर शनिवारपर्यंत (ता. २२) बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. वाढलेले वाऱ्याचे प्रवाह, समुद्राला उधाण येऊ लागले आहे. यातच किनारपट्टी भागात ढगांची दाटी झाली असून, कोकणात पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे लवकरच मॉन्सूनचे आगमनाची वर्दी मिळणार असून, कोकणात उद्यापासून पाऊस जोर धरणार आहे. तर रविवारपासून (ता. २३) मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे.   

 

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...
कृत्रिम पाऊस : गप्पा अन् गांभीर्यमागील पावसाळ्यातील कमी पावसामुळे राज्यात भीषण...
पेरणीने ओलांडली पन्नाशीः डाॅ. अनिल बोंडेमुंबई: राज्यात खरिपाची ८०.६१ लाख हेक्टर...
दोषी आढळल्यास विमा कंपन्यांवर गुन्हेः...कोल्हापूर: विमा कंपन्या शेतकऱ्यांना लाभ देण्यास...