agriculture news in Marathi, monsoon prediction will be declare today, Maharashtra | Agrowon

मॉन्सूनच्या आगमनाचा मुहूर्त आज ठरणार?

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 मे 2019

पुणे ः दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) आगमनाची आतुरता लागली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (आयएमडी) मॉन्सूनच्या आगमनाचे पर्वानुमान आज (ता.१५) जाहीर होण्याची शक्यता आहे. अंदमान निकोबार बेटसमूह आणि देवभूमी केरळात मॉन्सून कधी दाखल होणार, या तारखा पूर्वानुमानातून स्पष्ट होणार आहे.

पुणे ः दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) आगमनाची आतुरता लागली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (आयएमडी) मॉन्सूनच्या आगमनाचे पर्वानुमान आज (ता.१५) जाहीर होण्याची शक्यता आहे. अंदमान निकोबार बेटसमूह आणि देवभूमी केरळात मॉन्सून कधी दाखल होणार, या तारखा पूर्वानुमानातून स्पष्ट होणार आहे.

दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार मॉन्सून साधारणतः २० मेच्या जवळपास अंदमान समुद्र आणि बेटांच्या दक्षिण भागात दाखल होतो, तर १ जूनला केरळमधून मॉन्सूनचे देशात आगमन होते. केरळात दाखल झाल्यानंतर साधारणतः ७ जून रोजी कोकणातून मॉन्सून वारे महाराष्ट्रात पोचतात. त्याआधी मे महिन्यापासून राज्यात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळतात. यंदा राज्यात चटका चांगलाच वाढला असून, पूर्वमोसमी पावसाअभावी उन्हाळा असह्य झाला आहे. यातच पाणीटंचाईची तीव्रता वाढल्याने मॉन्सूनच्या आगमनाची आतुरता वाढली आहे.

बंगालच्या उपसागरात आलेल्या फणी चक्रीवादळामुळे बदललेले वाऱ्याचे प्रवाह सुरळीत होऊन मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती तयार होण्यासाठी कालावधी लागल्याने मॉन्सूनचे आगमन लांबण्याचे संकेत काही हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

पूर्वमोसमी पावसासाठी आवश्यक स्थितीनुसार, साधारणतः २१ एप्रिलदरम्यान केरळजवळच्या समुद्रात ढग जमा होऊन ते पूर्वेकडे सरकण्यास सुरवात होते. मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवताना ही स्थिती विचारात घेतली जाते. यंदा १० दिवस उशिराने स्थिती निर्माण झाली असल्याने यंदा मॉन्सूनचे आगमन आठवडाभर लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी, मॉन्सूनच्या आगमनाविषयी आयएमडीकडून वर्तविण्यात येणाऱ्या पूर्वानुमानाकडे लक्ष लागले आहे.

केरळात मॉन्सून वेळेवरच 
विषुवृत्ताजवळील हिंद महासागरात वाऱ्याची दिशा बदलत आहे. उत्तर भारतात जमिनीवर हवेचे दाब कमी होऊन ९९८ पर्यंत कमी झाले आहे, तर समुद्रात हवेचे दाब १०१० पर्यंत आहेत. मॉन्सून वेळेत दाखल होण्यास हे चिन्ह अनुकूल आहे. त्यामुळे केरळात मॉन्सून वेळेवरच दाखल होईल, असे मत हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केले.


इतर अॅग्रो विशेष
दक्षिण कर्नाटक, तामिळनाडूत मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज (ता....
कोकणात पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रात आलेल्या ‘निसर्ग’...
रविवारपर्यंत मॉन्सूनची आणखी चाल शक्य पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरूवारी...
हमीभाव मिळवून देण्यात केंद्र सरकार...पुणे: केंद्र सरकार गाजावाजा करून हमीभाव जाहीर करत...
शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बियाणे अनुदान...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बियाणे...
साखर कारखान्यांनी लॉकडाउनमध्ये जमा केली...पुणे: लॉकडाउनमधील विविध अडचणींना तोंड देत...
माझा शेतकरी, माझा अभिमान ! ७ ते १३ जून...पुणे : कोरोनाच्या कठिणकाळात जनता घरबंद असताना...
कृषी उन्नती योजनेत ६६ टक्के कपातपुणे: कृषी उन्नती योजना राबविण्यासाठी केंद्र...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
दर्जेदार हळद पावडरीचा शिनगारे यांचा...परभणी जिल्ह्यातील वालूर सारख्या ग्रामीण भागात...
शेतकरी संघटना शुक्रवारी करणार ...नागपूर ः एचटीबिटीला मान्यता मिळावी या मागणीसाठी...
विधानपरिषदेच्या ८ सदस्यांची मुदत समाप्तमुंबई: विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्त ८...
चक्रीवादळाच्या तडाख्यात मधूमका भुईसपाटनाशिक: नाशिक, सिन्नर व इगतपुरी तालुक्यांमध्ये १...
सातत्य, चिकाटी, प्रयत्नांतून...कोणताही व्यवसाय यशस्वी करायचा तर सातत्य आणि...
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...