मॉन्सून अंदाज आज जाहीर होणार?

मॉन्सून अंदाज आज जाहीर होणार?
मॉन्सून अंदाज आज जाहीर होणार?

पुणे : दुष्काळात होरपळत असलेल्या महाराष्ट्राला यंदाच्या पावसाळ्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. यातच प्रशांत महासागरातील एल-निनो स्थितीचा मॉन्सूनच्या पावसावर परिमाण होणार का, यंदा पाऊस दमदार कोसळणार की पुन्हा ओढ देणार, याबाबतच्या प्रश्नांना भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानंतर उत्तर मिळणार आहे. आयएमडीकडून यंदाच्या मॉन्सूनचा पहिला पूर्वानुमान आज (ता. १५) जाहीर होण्याची शक्यता आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) पावसावर एल-निनोचे सावट असल्याने यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज खासगी हवामान संस्था वर्तवित आहेत. मात्र काही हवामान तज्ज्ञांच्या मते एल-निनो स्थितीचा भारतीय मॉन्सूनवर परिणाम होणार नसून, यंदा चांगला पाऊस पडण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून जाहीर केल्या जाणाऱ्या पूर्वानुमानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाने गतवर्षी देशात ९७ टक्के म्हणजेच सरासरी इतक्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. तर सुधारित अंदाज वर्तवितानाही सामान्य पावसाचे पूर्वानुमान दिले होते. तर स्कायमेट या खासगी संस्थेनेही चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली होती. गतवर्षी मॉन्सून हंगामात देशात अवघा ९१ टक्के पाऊस पडला होता. यात महाराष्ट्रातील कोकण (९९ टक्के), मध्य महाराष्ट्र (९१ टक्के), तर विदर्भ (९२ टक्के) या तीन विभागांत सरासरी इतका, तर मराठवाड्यात (७८ टक्के) सरासरीच्या तुलनेत अपुरा पाऊस झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. गतवर्षी पावसाने दमदार सुरवात केल्यानंतर, पावसात मोठे खंड पडले. यातच शेवटच्या टप्प्यात परतीच्या पावसाने ओढ दिल्याने सध्या राज्याला तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान स्कायमेट या खासगी संस्थेने यंदा सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९३ टक्के पावसाचे पूर्वानुमान वर्तविले आहे. यात मॉन्सूनच्या पावसावर एल निनोचा प्रभाव राहणार असल्याचे म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com