agriculture news in marathi, monsoon prediction will be delaire today, Maharashtra | Agrowon

मॉन्सून अंदाज आज जाहीर होणार?

टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 एप्रिल 2019

पुणे : दुष्काळात होरपळत असलेल्या महाराष्ट्राला यंदाच्या पावसाळ्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. यातच प्रशांत महासागरातील एल-निनो स्थितीचा मॉन्सूनच्या पावसावर परिमाण होणार का, यंदा पाऊस दमदार कोसळणार की पुन्हा ओढ देणार, याबाबतच्या प्रश्नांना भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानंतर उत्तर मिळणार आहे. आयएमडीकडून यंदाच्या मॉन्सूनचा पहिला पूर्वानुमान आज (ता. १५) जाहीर होण्याची शक्यता आहे.

पुणे : दुष्काळात होरपळत असलेल्या महाराष्ट्राला यंदाच्या पावसाळ्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. यातच प्रशांत महासागरातील एल-निनो स्थितीचा मॉन्सूनच्या पावसावर परिमाण होणार का, यंदा पाऊस दमदार कोसळणार की पुन्हा ओढ देणार, याबाबतच्या प्रश्नांना भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानंतर उत्तर मिळणार आहे. आयएमडीकडून यंदाच्या मॉन्सूनचा पहिला पूर्वानुमान आज (ता. १५) जाहीर होण्याची शक्यता आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) पावसावर एल-निनोचे सावट असल्याने यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज खासगी हवामान संस्था वर्तवित आहेत. मात्र काही हवामान तज्ज्ञांच्या मते एल-निनो स्थितीचा भारतीय मॉन्सूनवर परिणाम होणार नसून, यंदा चांगला पाऊस पडण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून जाहीर केल्या जाणाऱ्या पूर्वानुमानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हवामान विभागाने गतवर्षी देशात ९७ टक्के म्हणजेच सरासरी इतक्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. तर सुधारित अंदाज वर्तवितानाही सामान्य पावसाचे पूर्वानुमान दिले होते. तर स्कायमेट या खासगी संस्थेनेही चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली होती. गतवर्षी मॉन्सून हंगामात देशात अवघा ९१ टक्के पाऊस पडला होता. यात महाराष्ट्रातील कोकण (९९ टक्के), मध्य महाराष्ट्र (९१ टक्के), तर विदर्भ (९२ टक्के) या तीन विभागांत सरासरी इतका, तर मराठवाड्यात (७८ टक्के) सरासरीच्या तुलनेत अपुरा पाऊस झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. गतवर्षी पावसाने दमदार सुरवात केल्यानंतर, पावसात मोठे खंड पडले. यातच शेवटच्या टप्प्यात परतीच्या पावसाने ओढ दिल्याने सध्या राज्याला तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान स्कायमेट या खासगी संस्थेने यंदा सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९३ टक्के पावसाचे पूर्वानुमान वर्तविले आहे. यात मॉन्सूनच्या पावसावर एल निनोचा प्रभाव राहणार असल्याचे म्हटले आहे.


इतर बातम्या
लोणावळा येथे सर्वाधिक पावसाची नोंदपुणे  ः पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात...
बियाणे उगवणीबाबत नगरमध्ये ७६८ तक्रारीनगर  ः सोयाबीन, बाजरीच्या निकृष्ट...
अकोले तालुक्यात भात लागवडीचे प्रमाण कमीचनगर  : अकोले तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार...
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोरमुंबई  : मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत...
देशात यंदा कापूस लागवड वाढणारजळगाव ः देशात २०२०-२१च्या हंगामात कापसाचे उत्पादन...
म्हैसाळ योजनेची दोन कोटींची पाणीपट्टी...सांगली  : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कमी जोररत्नागिरी  ः जिल्ह्यात शनिवारी (ता.४) जोरदार...
आपले सरकार सेवा केंद्रांची होणार तपासणी पुणे ः पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अनेक...
महाराष्ट्रात केसर आंब्याच्या क्षेत्रात...नगर ः फळपिकांत आंबा महत्त्वाचे पीक आहे. त्यामुळे...
गोदामाअभावी मका खरेदी बंद चंद्रपूर ः गोंड पिंपरी तालुक्यातील भंगाराम...
कृषीमध्ये स्टार्टअप, उद्योजकतेला...नवी दिल्ली: नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि...
भिवापुरी मिरचीच्या उत्पादकता वाढीसाठी...नागपूर  : भौगोलिक मानांकन मिळालेल्या आणि...
महागाव तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची...अंबोडा, जि. यवतमाळ  ः महागाव तालुक्यात...
बागा पुनर्लागवडीसह सफाईसाठी अर्थसाह्य...रत्नागिरी ः निसर्ग चक्रीवादळात मंडणगड, दापोलीसह...
आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत...यवतमाळ : कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार...
खरिपातील धानाला देणार २५०० रुपयांचा दर...भंडारा  ः केंद्र सरकारकडून धानाला हमीभाव...
भंडारदरा परिसरात आढळला घोयरा सरडा अकोले, जि. नगर ः घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिएओन...
मुंबईसह कोकणात धुवांधार पुणे : कोकण किनारपट्टीवर दोन दिवसांपासून पावसाने...
देशात खरीप पेरणीला वेग नवी दिल्ली: यंदाच्या खरीप हंगामात परेणीने जोर...
नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याची सव्वा लाख...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...