agriculture news in Marathi monsoon progress continue Maharashtra | Agrowon

मॉन्सूनची वाटचाल सुरूच 

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर वाटचाल सुरूच आहे. शनिवारी (ता. १२) मॉन्सूनने बंगालचा उपसागर, ओडिशाचा काही भाग, पश्‍चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागांत प्रगती केली आहे.

पुणे : उत्तर भारतात मॉन्सून दाखल झाल्यानंतर वाटचाल सुरूच आहे. शनिवारी (ता. १२) मॉन्सूनने बंगालचा उपसागर, ओडिशाचा काही भाग, पश्‍चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागांत प्रगती केली आहे. आज (ता.१२) मॉन्सून उत्तर भारतातील काही राज्यांत प्रगती करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राज्य व्यापल्यानंतर मॉन्सूनने उत्तरेकडे कूच केली आहे. या भागात मॉन्सून वेगाने पुढे सरकत आहे. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागात मॉन्सूनने शनिवारी फारशी प्रगती केली नाही. मात्र बंगालचा उपसागर व ईशान्येकडील राज्यात मॉन्सूनने बऱ्यापैकी प्रगती केली आहे. त्यामुळे मॉन्सूनने दीव, सुरत, नंदुरबार, राइसेन दामोह, उमराई, पेढ्रा रोड, बोलांगीर, भुवनेश्‍वर, बारीपाडा, पुरुलिया, धनबाद, दारबंगापर्यंत मजल मारली आहे. मॉन्सूनला पुढे सरकण्यासाठी आणखी पोषक वातावरण आहे. त्यामुळे आणखी काही भागांत दाखल होण्याचे संकेत आहेत. 

सध्या ओडिशा, पश्‍चिम बंगाल ते बंगाल उपसागराच्या ईशान्य भागापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झालेले आहे. पुढील तीन ते चार दिवसांत या भागात मॉन्सून आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात मॉन्सून सरकत असताना पावसाने चांगलीच हजेरी लावली असून, अनेक भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील काही भागांत मॉन्सून चांगलाच सक्रिय झाल्याने राज्यातही जोरदार ते मुसळधार पाऊस कोसळत आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
द्राक्षशेतीत हवी कृत्रिम बुद्धिमत्ता ः...पुणे ः देशाच्या द्राक्षशेतीला आधुनिक वळण...
राज्यात जोरदार पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी...
कोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....
द्राक्षशेतीत परीक्षणानंतर...पुणे ः ‘‘अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन उत्तमरीत्या...