उत्तर भारतात मॉन्सूनची प्रगती 

उत्तर भारतात मॉन्सूनला प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. शुक्रवारी (ता. १८) मॉन्सूनने उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग आणि सौराष्ट्रात चाल केली आहे.
monsoon
monsoon

पुणे : उत्तर भारतात मॉन्सूनला प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. शुक्रवारी (ता. १८) मॉन्सूनने उत्तर अरबी समुद्र, गुजरातचा काही भाग आणि सौराष्ट्रात चाल केली आहे. राजस्थानचा वायव्य भाग, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशही मॉन्सूनने व्यापला असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

रविवारी (ता. १३) मॉन्सूनने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगालचा काही भाग व्यापला होता. त्यानंतर दिल्ली, हरियाना आणि पंजाबपर्यंत मजल मारण्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते. मात्र सोमवारपासून मॉन्सूनमध्ये फारशी प्रगती नव्हती. गुरुवारी काही प्रमाणात पोषक वातावरण तयार झाल्यानंतर शुक्रवारी मॉन्सूनने आणखी काही भागांत मजल मारली आहे. आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्याचे संकेत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com