agriculture news in Marathi monsoon progress possible in Andaman by tomorrow Maharashtra | Page 2 ||| Agrowon

अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मे 2020

बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळाली. रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला.

पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळाली. रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर तब्बल नऊ दिवस मॉन्सूनने कोणतीही प्रगती केली नाही. उद्या (ता.२७) अंदमान बेटांच्या आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याचा पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

बंगालच्या उपसागरातील ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे काही दिवस आधीच मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला. मात्र चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनचे प्रवाह प्रभावीत झाले, तसेच समुद्रावरील बाष्प ओढून नेल्याने या भागात मुख्यत: कोरडे हवामान झाल्याने मॉन्सूनची कोणतही प्रगती झालेली नाही. सध्या बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून मॉन्सून वाऱ्यांसाठी पोषक स्थिती तयार होत आहे. बुधवारपर्यंत (ता.२७) अंदमान बेटांच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होणार असल्याचे सोमवारी (ता.२५) स्पष्ट करण्यात आले. 

दरम्यान यंदा केरळातील मॉन्सूनचे आगमन काहीसे लांबणार आहे. यंदा मॉन्सून चार दिवस उशीराने पाच जून रोजी केरळात पोहोचण्याचा अंदाज आहे. तसेच मॉन्सूनचे अंदमानातील आगमनाचा, केरळातील आगमन आणि देशातील पावसाच्या प्रमाणाशी कोणतही परस्पर संबध नसल्याचे हवामान विभागाने आधीच स्पष्ट केले आहे.

तर ‘अम्फाम’ चक्रीवादळामुळे प्रभावित झालेले प्रवाह सुरळीत होत असल्याने लवकरच मॉन्सूनची वाटचाल सुरू होणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 


इतर अॅग्रो विशेष
पुण्यात शेतमाल पुरवठा देखील बंद पुणे: कोरोनाची उफाळून आलेली साथ रोखण्यासाठी...
देशाच्या सूत निर्यातीत मोठी घट जळगाव ः कोरोना व इतर संकटांमध्ये देशातील सूत...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...
रुतलेले अर्थचक्राने विकासालाही ‘ब्रेक’''मूडी'' या पतमानांकन संस्थेने अलीकडेच आपला अहवाल...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात...सोलापूर ः  आषाढी यात्रेच्या कालावधीसाठी श्री...
बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेचा कारभार...नागपूर ः ‘शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे...
राज्यात पावसाचा कमी अधिक जोर पुणे : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज वादळी...पुणे : कोकणात अनेक ठिकाणी पावसाचा मुसळधार पाऊस...
‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा...नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर...