agriculture news in marathi, Monsoon progress in Sikkim, west bengal | Agrowon

मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत मजल
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 जून 2019

पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. अद्यापाही वादळाचे अस्तित्व असल्याने अरबी समुद्रातून मॉन्सूनने अपेक्षित चाल केलेली नाही. तर बंगालच्या उपसागरावरील शाखेने आणखी एक टप्पा पूर्ण केला आहे. रविवारी (ता. १६) मॉन्सूनने संपूर्ण ईशान्य भारत व्यापून पूर्व भारतातील सिक्कीम, पश्चिम बंगालच्या काही भागापर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. 

पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. अद्यापाही वादळाचे अस्तित्व असल्याने अरबी समुद्रातून मॉन्सूनने अपेक्षित चाल केलेली नाही. तर बंगालच्या उपसागरावरील शाखेने आणखी एक टप्पा पूर्ण केला आहे. रविवारी (ता. १६) मॉन्सूनने संपूर्ण ईशान्य भारत व्यापून पूर्व भारतातील सिक्कीम, पश्चिम बंगालच्या काही भागापर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. 

‘वायू’ चक्रीवादळामुळे थांबलेला उत्तरेकडील प्रवास सुरू करत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शुक्रवारी (ता. १४) दक्षिण कर्नाटकच्या मंगळूर, मैसूर, तमिळनाडूतील सालेम, कुड्डालोरपर्यंत मजल मारली. ईशान्य भारतातील त्रिपुरा, असाम आणि अरुणाचल प्रदेश राज्याच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर अरबी समुद्रावरून मॉन्सूनची वाटचाल झालेली नाही. मात्र रविवारी बंगालच्या उपसागरावरील शाखेने सिक्कीमची राजधानी गंगटोक आणि पश्चिम बंगालमधील अलीपूरदूअरपर्यंतच्या भागापर्यंतचा टप्पा पूर्ण केला आहे. 

केरळमध्ये यंदा आठवडाभर उशिराने येणाऱ्या मॉन्सूनचे महाराष्ट्रातील आगमनही खूपच लांबले आहे. सर्वसाधारण वेळेनुसार साधारणत: ७ जूनपर्यंत तळकोकणात मॉन्सूनचे आगमन होते. तर १० जूनपर्यंत मॉन्सून पुणे, मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांशी भाग व्यापतो. तर १५ जूनपर्यंत मॉन्सून वेगाने वाटचाल करत, पूर्व भारतातील सर्व राज्य, गुजरात आणि मध्य प्रदेशाचा बहुतांशी भाग व्यापतो. यावर्षी सुरवातीपासून अडखळणाऱ्या मॉन्सूनची वाटचाल खूपच धीम्या गतीने सुरू आहे. १६ जून उलटूनही मॉन्सूनने दक्षिण कर्नाटकपर्यंतच मजल मारली आहे.

‘वायू’ चक्रीवादळ ओसरतेय
अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत घोंघावत असलेले अतितीव्र वायू चक्रीवादळ आसेरत आहे. गुजरातच्या किनाऱ्यापासून पश्चिमेकडे सरकत असलेले हे चक्रीवादळ पुन्हा गुजरातच्या किनाऱ्याकडे माघारी फिरणार आहे. रविवारी (ता. १६) सकाळी अकरा वाजता हे वादळ गुजरातच्या किनाऱ्यावरील पोरबंदरपासून पश्चिमेकडे ७४० किलोमीटर, द्वारकापासून ४४० किलोमीटर आणि भूजपासून ५४५ किलोमीटर पश्चिमेकडे समुद्रात होते. हे वादळ सोमवारी मध्य रात्रीपर्यंत वादळ तीव्र कमी दाब क्षेत्राच्या स्वरूपात उत्तर गुजरातला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंगळवारपर्यंत (ता. १८) गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...