agriculture news in Marathi monsoon progress is stable Maharashtra | Agrowon

प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल...

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 जून 2020

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता.१) देवभुमी केरळमध्ये दाखल झाले. मात्र त्यानंतर बुधवारी (ता.३) वाऱ्यांनी आणखी वाटचाल केली नाही.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता.१) देवभुमी केरळमध्ये दाखल झाले. मात्र त्यानंतर बुधवारी (ता.३) वाऱ्यांनी आणखी वाटचाल केली नाही. अरबी समुद्रातील ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे प्रभावित झालेले प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची कर्नाटकसह महाराष्ट्राकडे वाटचाल सुरू होणार असल्याचे हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगितले. 

अरबी समुद्रात असलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे वाऱ्यांना खेचून आणल्याने मॉन्सून नियमित वेळेवर १ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला आहे. मॉन्सूनने सोमवारी (ता.१) केरळच्या कन्नूर, तामिळनाडूच्या कोईंबतूर, कन्याकुमारीपर्यंतचा भाग व्यापला. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत जाताना किनारपट्टीलगत मॉन्सूनची आणखी वाटचाल होण्याची शक्यता होती.

केरळ, कोमोरीनचा संपूर्ण भाग, तामिळनाडूचा आणखी काही भाग, पदुच्चेरीसह आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते. मात्र ‘निसर्ग’मुळे मॉन्सून वाऱ्यांवर प्रभाव पडला असून, बुधवारी (ता. ३) मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’ होती. 

दरम्यान अरबी समुद्रवरूनही मॉन्सूनची वाटचाल पुन्हा रेंगाळली आहे. ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात १७ मे रोजी मॉन्सून दाखल झाला. वादळ उत्तरेकडे सरकून, बाष्प आढून नेल्याने मॉन्सूनची वाटचाल थांबली. २७ मे रोजी मॉन्सूनने पुढे चाल केली. २८ मे रोजी संपुर्ण अंदमान बेटांसह बंगालच्या उपसागरात प्रगती केल्यानंतर पुढील वाटचाल पुन्हा अडखळली आहे.

सोमवारी (ता.१) श्रीलंकेसह, दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागात मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर पुन्हा मॉन्सूनच्या प्रगतीला ‘ब्रेक’ लागला आहे, चक्रीवादळ निवळल्यानंतर मॉन्सूनची कर्नाटक, महाराष्ट्राकडे वाटचाल सुरू होणार आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
अजून एक `लातूर पॅटर्न’कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून...
सत्त्वयुक्त उत्पादनांची हवी कृषी...माणसाच्या उपभोगासाठी उपयुक्त असलेली जैवविविधता...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
राज्यातील २५ लाख खातेदारांना साडेसोळा...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
दूध भुकटी योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
जिल्हा बँकांना शासकीय व्यवहार करण्यास...मुंबई : शासकीय निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन...
राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे...सोलापूर : राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२...
नियमनमुक्तीला पुणे महापालिकेचा हरताळपुणेः एकीकडे केंद्र आणि राज्य शासन शेतमाल बाजार...
विदर्भात वादळी पावसाचा अंदाजपुणे: कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय...
मराठवाड्यात सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक...औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के...
कृषी व्यापार अध्यादेशामुळे दिलासापुणे: केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार...
खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरीपुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
‘सरफेसी' कायदा आहे तरी काय? दिवसेंदिवस बॅंकांच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत...
लष्करी’ हल्लाखरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने गेल्या काही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू...