राज्यात मॉन्सूनची जोरदार मुसंडी 

गेले दोन दिवस मॉन्सूनचा वेग कमी झाला होता. बुधवारी (ता. ९) मॉन्सूनने पुन्हा वेगाने वाटचाल सुरू केली असून, मुंबईसह संपूर्ण कोकण, मालेगाव, मराठवाड्यासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भात नागपूरपर्यंतचा बहुतांशी भाग व्यापला आहे.
09 june
09 june

पुणे : गेले दोन दिवस मॉन्सूनचा वेग कमी झाला होता. बुधवारी (ता. ९) मॉन्सूनने पुन्हा वेगाने वाटचाल सुरू केली असून, मुंबईसह संपूर्ण कोकण, मालेगाव, मराठवाड्यासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भात नागपूरपर्यंतचा बहुतांशी भाग व्यापला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

मॉन्सूनने रविवारी (ता. ६) पुणे, अलिबागसह राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वेळेआधीच दाखल होणाऱ्या मॉन्सूनने त्यानंतर दोन दिवस कोणतीही वाटचाल केली नव्हती. वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा सक्रिय झाल्याने मुंबई, कोकण, मराठवाडा, तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत प्रगती केली आहे. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून राज्यातील बहुतांशी भागांत जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाने चांगलाच दणका दिला असून, अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. 

मॉन्सूनने गुजरातच्या वलसाड, उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव, विदर्भातील नागपूरपर्यंत मजल मारली. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता.११) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, अंदमान बेटांसह केरळातील आगमन लांबल्याने मॉन्सून गुरुवारी (ता. ३) दक्षिण केरळात दाखल झाला. त्यानंतर अरबी समुद्रावरून वेगाने वाटचाल करत दोनच दिवसांत मॉन्सूनने महाराष्ट्रापर्यंत मजल मारली. रविवारी (ता.६) तब्बल चार दिवस आधीच पुण्यात हजेरी लावली होती. हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात १०६ टक्के पावसाची शक्यता आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com