आठ दिवसांनतर मॉन्सूने हलविला अंदमान मुक्काम...

माॅन्सून वाटचाल
माॅन्सून वाटचाल

पुणे ः नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता. ३०) अरबी समुद्राच्या दक्षिण भागात असलेल्या मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागापर्यंत मजल मारली आहे. तर बंगालच्या उपसागरावरील मॉन्सूनच्या शाखेने आणखी वाटचाल करत संपूर्ण अंदमान बेटसमूहांचा भाग व्यापला आहे. यंदा ६ जूनपर्यंत मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याचे पूर्वानुमान हवामान विभागाने वर्तविले आहेत. यंदा मॉन्सूनची अंदमानातील वाटचाल काहीशी अडखळतच झाली. मॉन्सून १८ जून रोजी अंदमान बेटांच्या दक्षिणेस असलेल्या निकोबार बेटांवर दाखल झाला होता. त्यानंतर तब्बल आठ दिवसांनी वाऱ्यांनी प्रगती करत शनिवारी (ता. २५) थोडीशी चाल करत निकोबार बेटांचा संपूर्ण भाग व्यापून, उत्तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली होती. गेल्या पाच दिवसांपासून अंदमान बेटांच्या दक्षिणेत मुक्कामी असलेल्या मॉन्सूनने अखेर आज (ता. ३०) मोठी चाल केली आहे. संपूर्ण अंदमान व्यापून बंगालच्या उपसागराचा नैर्ऋत्य आणि पूर्व-मध्य भागापर्यंत मजल मारली आहे. मॉन्सून यंदा नियमित वेळेच्या पाच दिवस उशिराने दाखल होण्याचे संकेत आहेत. तर गुरुवारी (ता. ३०) वाऱ्यांनी अरबी समुद्रातील मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे वाऱ्यांच्या देवभूमीवरील आगमानबाबत उत्सुकता वाढली आहे. भारताच्या दक्षिणेकडे असलेल्या समुद्रावर ढगांनी दाटी करण्यास सुरवात केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com