पावसाचा जोर ओसरला

पाऊस
पाऊस

पुणे : सौराष्ट्र व लगतच्या गुजरातच्या उत्तरेकडील भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र कच्छ व लगतच्या पाकिस्तानच्या दक्षिण भाग आणि अरबी समुद्राच्या ईशान्य भागाकडे सरकले आहे. तसेच कर्नाटक ते केरळ किनारपट्टीवर असलेले द्रोणीय क्षेत्र विरून गेले आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असून अनेक भागात पावसाने उघडीप दिली.   कोकण व गोव्यात बऱ्याच ठिकाणी येत्या सोमवार (ता. ४) पर्यंत हलका पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र व मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसतील. आज कोकणातील बहुतांशी ठिकाणी हलका पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. कोकणातील काही ठिकाणी बुधवारी जोरदार पाऊस पडला असून अनेक ठिकाणी हलक्या पावसाची रिमझिम सुरू होती. चिपळूणमध्ये सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस पडला. गुरुवारी (ता.३१) कोकणात अधूनमधून सरी बरसत होत्या. मध्य महाराष्ट्रातील इगतपुरी, लोणावळा, राधानगरी, मावळ, वेल्हा, भोर, मुळशी व महाबळेश्वर परिसरात हलका पाऊस पडला. उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. तर काही ठिकाणी सकाळपासून उन पडत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com