Agriculture news in Marathi, Monsoon, rain, Maharashtra | Agrowon

पावसासाठी तयार होतेय पोषक स्थिती
संदीप नवले
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

पुणे : सध्या राज्यातील काही ठिकाणी हवेचा दाब कमी होत आहे. यामुळे पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून, शनिवार (ता. २६) पासून पुन्हा राज्यातील बहुतांशी भागांत जोरदार पाऊस होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

बुधवारी (ता. २३) कोकणातील काही ठिकाणी हलका पाऊस पडला, तर राज्याच्या उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. येत्या शनिवारपर्यंत पोषक हवामान होऊन जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

पुणे : सध्या राज्यातील काही ठिकाणी हवेचा दाब कमी होत आहे. यामुळे पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून, शनिवार (ता. २६) पासून पुन्हा राज्यातील बहुतांशी भागांत जोरदार पाऊस होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

बुधवारी (ता. २३) कोकणातील काही ठिकाणी हलका पाऊस पडला, तर राज्याच्या उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. येत्या शनिवारपर्यंत पोषक हवामान होऊन जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

आज (गुरुवारी) कोकणातील बहुतांशी ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही ढगाळ हवामान होते. मंगळवारी (ता. २२) रात्री कोकणातील दोडामार्ग, मापूसा, दाभोलीम, हर्णे येथे हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील राधानगरी, शिरपूर येथेही पावसाच्या अधूनमधून सरी बरसल्या असून, अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. मराठवाड्यातील धारूर, केज, अंबेजोगाई येथेही हलक्‍या सरी कोसळल्या. विदर्भातील अकोट, चिखलदरा, दिनापूर, मेहकर, परतवाडा, वाशीम येथेही पाऊस पडला. 

बुधवारी (ता. २३) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस ः मिलिमीटरमध्ये
कोकण ः दोडामार्ग, मापूसा ३०, दाभोलीम, हर्णे, मार्मगोवा, पेडणे, पेरनेम, फोंडा, राजापूर, उरण २०, खालापूर, मडगाव, माथेरान, म्हसाळा, मुलदे, श्रीवर्धन, वैभववाडी, वाल्पोई, वेगुर्ला १०, 

मध्य महाराष्ट्र ः राधानगरी, शिरपूर २०, चोपडा, धरनेगाव, गगनबावडा, इगतपुरी, जामखेड, शेवगाव १०, 

मराठवाडा ः धारूर, केज २०, अंबेजोगाई, बिल्लोली, चाकूर, गंगापूर, कळंब, परळीवैजनाथ, पाटोदा १०, 

विदर्भ ः अकोट ४०, चिखलदरा ३०, दिनापूर, मालेगाव, मेहकर, परतवाडा, तेल्हारा, वाशीम २०, अंजनगाव,  राजूरा १०.

 

इतर अॅग्रो विशेष
जमिनीच्या सुपीकता वाढीतून साधली चौफेर...शेती अधिक उत्पादनक्षम करण्यासाठी धामणा (जि....
मत्स्योत्पादनात ठाणे जिल्हा अव्वलरत्नागिरी ः सागरी मत्स्योत्पादनात महाराष्ट्र...
दिवाळीनंतरच गाळप हंगाम सुरू होण्याची...कोल्हापूर : पूर परिस्थितीमुळे उसाचे मोठे नुकसान...
निवडणुकीत प्रभावी प्रचाराला मिळणार दहाच...बारामती, जि. पुणे : विधानसभा निवडणुकीत सर्वच...
मराठवाड्यातही कपाशीवर लष्करी अळीचा आढळपरभणी : जिल्ह्यात मका पिकापाठोपाठ कपाशीवर काही...
पावसाची उघडीप; उन्हाचा चटका वाढलापुणे : अरबी समुद्रातील परिसरात असलेले कमी दाबाचे...
द्राक्षावर तंबाखूची पाने खाणारी अळीभवानीनगर, जि. पुणे : द्राक्षावर यंदाही...
सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक...अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ...
लष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी...पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी...
खानदेशातही कापसावर लष्करी अळीजळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील...
विधानसभेचा बिगुल वाजलामुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे...
कांदा दरस्थिती आढाव्यासाठी केंद्राचे...नाशिक : कांदा दर, आवक स्थितीचा आढावा...
पापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...
बाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...
अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...
नावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...
औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...
कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक...
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...