उजनीतून सोडले भीमा नदीत पाणी 

उजनी धरण संग्रहित छायाचित्र
उजनी धरण संग्रहित छायाचित्र

सोलापूर ः पुणे जिल्ह्यातील धरणातून आज सकाळी आठ वाजल्यापासून जवळपास 55 हजार क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे. ते पाणी उजनी धरणात येते. दुपारी 12 वाजता उजनी धरणातून भीमा नदीमध्ये दीड हजार, कालव्यातून 400 तर बोगद्यातून 50 क्‍सुसेकने पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. धरणात दौंड येथून 42 हजार 627 क्‍युसेकने पाणी मिसळत आहे. 

आज दुपारी 12 वाजता धरणात उपयुक्त पाण्याची टक्केवारी 92.15 इतकी होती. धरण 90 टक्‍यांच्या पुढे गेल्यानंतर त्यातून भीमा नदीमध्ये पाणी सोडले जाईल, असे धरण प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज सकाळी 11 वाजल्यापासून नदी, कालवा व बोगद्याच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आले आहे. दौंड येथील विसर्गामध्ये वाढ होत गेली तर धरणातून नदी, कालवा व बोगद्यामध्ये पाणी सोडण्याचा वेग वाढविला जाण्याची शक्‍यता आहे. संध्याकाळपर्यंत धरणातून जादा प्रमाणात पाणी सोडले जाण्याची शक्‍यता आहे. कारण पुणे जिल्ह्यातील धरणातून सकाळी आठ वाजता जवळपास 55 हजार क्‍युसेकने पाणी वेगवेगळ्या नद्यांच्या माध्यमातून उजनी धरणात मिसळत आहे.  --------  प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा  दरम्यान, भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर यांनी पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा, इंदापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या तालुक्‍यातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणात मिसळत असलेल्या पाण्यामुळे धरणातून कोणत्याही स्थितीत 15 ते 20 हजार क्‍युसेकने पाणी सोडले जाणार आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात जादा पाऊस झाल्यास या सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये वाढ केली जाईल. त्यामुळे भीमा नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याचे या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सर्व तालुक्‍याच्या तहसीलदारांना दुपारी साडेबारा वाजता इ-मेलद्वारे कळविले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com