मॉन्सून केरळच्या उंबरठ्यावर

हवामान
हवामान

पुणे: नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. ५) श्रीलंका देशाचा जवळपास निम्मा भाग व्यापल्यानंतर वाऱ्यांनी कोणतीही प्रगती केलेली नाही. यातच वाऱ्यांचे देश भूमीवरील प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये आज (ता.८) मॉन्सून आगमन शक्य असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तर अरबी समुद्रात उद्या (ता. ९) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.  बुधवारी (ता.५) वाऱ्यांनी श्रीलंकेतील कोलंबोच्या उत्तरेकडे असलेल्या कातूनायके शहरापर्यंत टप्पा पार करून जवळपास निम्मा श्रीलंका देश व्यापला आहे. तर अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात वाऱ्यांनी प्रगती केली आहे. विषुववृत्ताकडून येत असलेले वाऱ्यांचे प्रवाह,  दक्षिण भागात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ३.६ किलोमीटर उंचीवर असलेले हवेचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र सक्रीय असून, महाराष्ट्र आणि केरळच्या किनाऱ्याला समांतर हवेच्या कमी दाब पट्ट्याची निर्मिती झाली आहे. ही स्थिती पोषक असल्याने शनिवारी (ता. ८) देवभूमी केरळात दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान अरबी समुद्रात केरळ-कर्नाटक किनारपट्टीलगत हवेचे कमी दाब क्षेत्र तयार होत आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र किनाऱ्यालगत उत्तरेकडे सरकत जाणार आहे. मॉन्सून केरळात दाखल झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या या क्षेत्राच्या वाटचालीवर मॉन्सूनची प्रगती ठरणार आहे.  बंगालच्या उपसागरावरील मॉन्सूनची शाखेची प्रगती शक्य असून, उद्यापर्यंत (ता.९) ईशान्य भारतातील काही राज्यात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. मॉन्सूनची वाटचाल यंदा अडखळतच सुरू आहे. १८ मे रोजी मॉन्सून अंदमानात पोचलेल्या मॉन्सूनने तब्बल आठवडाभरानंत २५ मे रोजी मॉन्सूनने थोडीशी चाल केली. ३० जून रोजी मॉन्सूनने संपर्ण अंदमान व्यापून अरबी समुद्राकडे वाटचाल केली. बुधवारपर्यंत (ता. ५) श्रीलंका देशाचा जवळपास निम्मा भाग व्यापलेल्या मॉन्सूनची प्रगती दोन दिवसांपासून जैसे थे आहे. त्यामुळे मॉन्सूनचे केरळातील आगमनही लांबले आहे. मॉन्सून ६ जून रोजी केरळात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. यात मॉन्सूनचे आगमनाला चार दिवसांचा उशीरही गृहीत धरण्यात आला होता. त्यानुसार मॉन्सून आज केरळात दाखल होऊ शकतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com