agriculture news in marathi, Monsoon to reach late in Andaman says IMD | Agrowon

मॉन्सूनचे अंदमानातील आगमन लांबणार?

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 मे 2018

पुणे : देशातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता लागून असलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) साधारणत: २० मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर आगमन होते. त्यापूर्वी दक्षिण अंदमान समुद्रामध्ये १५ मेच्या दरम्यान हे वारे दाखल होत असतात. मात्र, सध्यातरी दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून वाऱ्यासाठी पोषक स्थिती नसल्याने अंदमान-निकोबार बेटांवरही त्यांचे आगमन लांबण्याची शक्यता आहे. 

पुणे : देशातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता लागून असलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) साधारणत: २० मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर आगमन होते. त्यापूर्वी दक्षिण अंदमान समुद्रामध्ये १५ मेच्या दरम्यान हे वारे दाखल होत असतात. मात्र, सध्यातरी दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून वाऱ्यासाठी पोषक स्थिती नसल्याने अंदमान-निकोबार बेटांवरही त्यांचे आगमन लांबण्याची शक्यता आहे. 

देशात माॅन्सूनची वाटचाल होण्यापर्वी सर्वांत आधी बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची प्रगती होते. यात अंदमान-निकोबार बेटांवर मॉन्सूनच्या पावसाच्या सरी येतात. त्यानंतर बंगालच्या उपसागरातून मजल दरमजल करत वारे उत्तरेकडे पुढे जातात. तर मॉन्सूनची दुसरी शाखा अरबी समुद्रावरून पुढे सरकत दीर्घकालीन सरासरीनुसार एक जून रोजी केरळमधून देशात प्रवेश करते. 

मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर त्याची पुढील वाटचाल स्पष्ट होते. साधारणत: सात जूनपर्यंत कोकणपर्यंत पोचणारा मॉन्सून १० जूनपर्यंत महाराष्ट्राचा बहुतांशी भाग व्यापतो. यंदाच्या मॉन्सून हंगामात सरासरीच्या ९७ टक्के म्हणजेच सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने या पूर्वीच वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या असून, मॉन्सूनच्या आगमनाकडे लक्ष लागून आहे. 

मॉन्सून १५ मेच्या अासपास दक्षिण अंदमान समुद्रात येत असतो. मात्र, १४ तारीख उलटूनही मॉन्सूनच्या तेथे आगमनाची शक्यता दिसत नाही. सध्याची स्थिती पाहता अंदमानात मॉन्सूनच्या आगमनासाठी आणखी एक ते दोन दिवसांचा उशीर होण्याची शक्यता आहे. 
- ए. के. श्रीवास्तव, वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ, हवामान अंदाज


इतर अॅग्रो विशेष
सोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेतनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
`उज्ज्वला` योजनेत मोठा भ्रष्टाचारनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी...
गारठा पुन्हा वाढणारपुणे  ः राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून...
पूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळपुणे  ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन...
नाशिक जिल्ह्यात द्राक्षमणी पोखरणाऱ्या...नाशिक  : जिल्ह्यात द्राक्ष पीक फुलोरा व मणी...
मराठवाड्यातील ५५ प्रकल्प कोरडेचऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळाने...
पंजाबचे पशुपालक वापरतात सुधारित तंत्रलुधियाना (पंजाब) येथे प्रोग्रेसिव्ह डेअरी...
शेती, दुग्धव्यवसायाने बनविले...कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी)...
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...