agriculture news in Marathi, Monsoon reached in Andaman, Maharashtra | Agrowon

मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर अंदमानापर्यंत पोचण्यास पोषक हवामान
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 मे 2019

पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८) अंदमानात दाखल झाले आहेत. मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मंगळवारपर्यंत (ता. २१) उत्तर अंदमानापर्यंत मॉन्सूनची प्रगती होण्यास पोषक हवामान आहे. तर केरळात ६ जूनपर्यंत मॉन्सून दाखल होण्याचे पूर्वानुमान आहे.

पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८) अंदमानात दाखल झाले आहेत. मोसमी वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मंगळवारपर्यंत (ता. २१) उत्तर अंदमानापर्यंत मॉन्सूनची प्रगती होण्यास पोषक हवामान आहे. तर केरळात ६ जूनपर्यंत मॉन्सून दाखल होण्याचे पूर्वानुमान आहे.

हवामान विभागाने १८ ते १९ मेपर्यंत मॉन्सून अंदमानात येण्याचा अंदाज वर्तविलेला होता. अंदाजानुसार सर्वासाधारण आगमनाच्या (ता. २०) दोन दिवस अगोदर शनिवारी (ता. १८) मॉन्सून अंदमानात दाखल झाला आहे. विषुववृत्ताकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांचे प्रवाह, ढगाळ हवामान आणि ४८ तासांपासून पडणारा पाऊस या निरीक्षणांवरून दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि निकोबार बेटांवर मॉन्सूनने प्रगती केली आहे. 

तर बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, उत्तर अंदमान बेटांवर मॉन्सून पोचण्याची पोषक स्थिती आहे. तर २१ व २२ मे पर्यंत या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान गतवर्षी (२०१८) २५ मे रोजी अंदमानात दाखल झालेल्या मॉन्सूनने सर्वसाधारण वेळेपेक्षा दोन दिवस आधीच २९ मे रोजी केरळात धडक दिली होती. तर ८ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता. केरळमध्ये यंदा ६ जूनपर्यंत मॉन्सून दाखल होणार असून, वाऱ्याचे आगमन चार दिवस मागे पुढे होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. तर केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मॉन्सूनची पुढील वाटचाल निश्चित होणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
राज्य बॅंकेच्या दारात जिल्हा बॅंकांचे...सोलापूर : राज्यात १९७२ ची आठवण करून देणारा भयावह...
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे  : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य...
पूर संकटाचा नव्याने अभ्यास पुणे  : कृष्णा व भीमा खोऱ्यात यंदा आलेल्या...
शेतजमीन मोजणीचा गोंधळ सुरूचपुणे : ड्रोनच्या माध्यमातून गावांचे डिजिटल नकाशे...
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराने शेतकरी...नागपूर ः ‘संकरित बियाण्यांचा करा पेरा, लक्ष्मी...
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
कृषिसेवक भरती प्रक्रियेवरील बंदी...अकोला ः कृषी खात्याने १४१६ जागांसाठी राबवलेल्या...
यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची...पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या...
पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४...मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक...पुणे  : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या...
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...