agriculture news in Marathi, Monsoon reached at kolhapur, Maharashtra | Agrowon

मॉन्सूनची कोकणात जोरदार ‘एन्ट्री’; अनेक भागात पाऊस

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 जून 2019

पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे आगमन लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मॉन्सूनने गुरुवारी (ता. २०) कोकणात दमदार हजेरी लावत रत्नागिरी, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या कोल्हापूरपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सून दाखल झाल्यानंतर उद्यापासून (ता. २२) सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होत असून, वाहन हत्ती असल्याने पाऊस जोर धरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा मिळणार आहे.

पुणे : अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे आगमन लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मॉन्सूनने गुरुवारी (ता. २०) कोकणात दमदार हजेरी लावत रत्नागिरी, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या कोल्हापूरपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सून दाखल झाल्यानंतर उद्यापासून (ता. २२) सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होत असून, वाहन हत्ती असल्याने पाऊस जोर धरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा मिळणार आहे.

अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या ‘वायू’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. वादळ निवळल्यानंतरही काही दिवस अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह मंदच असल्याचे दिसून आले. मॉन्सूनने १४ जून रोजी दक्षिण कर्नाटकपर्यंतची वाटचाल पूर्ण केली. त्यानंतर किनारपट्टीच्या भागात वेगाने प्रगती करत मॉन्सूनने गुरुवारी संपूर्ण कर्नाटक किनारपट्टी, गोवा राज्य व्यापून दक्षिण कोकणातील रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरपर्यंत मजल मारली.

पूर्व भारतातील पश्चिम बंगालच्या आणखी काही भागांत प्रगती करत मॉन्सूनने कोलकत्यापर्यंतचा टप्पा पूर्ण केला आहे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत समुद्राला उधाण आले असून, जोरदार वारे वाहत आहेत. यामुळे मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती आहे. रविवारपर्यंत (ता. २३) कर्नाटक महाराष्ट्राचा आणखी काही भाग, संपूर्ण तमिळनाडू व्यापून आंध्र प्रदेश, तेलंगणाचा काही भाग, बिहार, झारखंड, ओडिशाच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

कमी दाबक्षेत्राची निर्मिती
उत्तर-मध्य प्रदेश आणि दक्षिण उत्तर प्रदेश परिसरावर असलेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी विरून गेले. तर बंगालच्या उपसागरात ईशान्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्याला लागूनच समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. तसेच पंजाबपासून उपसागरातील कमी दाबापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...
खताचे आठ रेल्वे रेक ‘अनलोड’ पुणे : कोरोना लॉकडाऊननंतर राज्याच्या विविध भागात...
राज्यातील २२० बाजार समित्यांचे कामकाज...पुणे: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन वाढवण्याचा विचार नाही : कॅबिनेट...नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४...
उन्हाच्या चटक्यात महाराष्ट्र होरपळणारपुणे : यंदाच्या उन्हळ्यात महाराष्ट्र उन्हाच्या...
यंदाची चैत्री वारी रद्द, पंढरपुरात येऊ...सोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची...
पुणे बाजार समितीत १७ हजार क्विंटल फळे...पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
जळगाव बाजारसमितीत सोशल डिस्टन्सिंगकडे...जळगाव  ः येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...
देशात कोरोनाबाधीत १०७१ रुग्ण  नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीत रुग्णांची...
कोकण रेल्वेकडून अत्यावश्यक वस्तूंची जलद...रत्नागिरीः देशभरातील जनतेला आवश्यक वस्तूंचा...
सोनाई प्रकल्पात दहा लाख लिटर दूध नासले...पुणे: कोरोनामुळे राज्यात दुधाचा महापूर सुरू झाला...
बार्शी तालुक्यातील द्राक्षपट्टा...सोलापूर  ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
पुणे विभागात ३२९ क्विंटल भाजीपाल्याची...पुणे  ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शाळांमध्ये शिल्लक धान्यांचे ...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळांना...