agriculture news in Marathi, Monsoon reached at south karnatka, Maharashtra | Agrowon

कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या महाराष्ट्र आगमनाची उत्सुकता
सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 जून 2019

पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे थांबलेला नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) उत्तरेकडील प्रवास सुरू झाला आहे. शुक्रवारी (ता. १४) मॉन्सून केरळचा उर्वरित भाग व्यापून दक्षिण कर्नाटकात दाखल झाला आहे. मॉन्सूनने कर्नाटकातील मंगळूर, म्हैसूरपर्यंत मजल मारली आहे, तर तमिळनाडूतील सालेम, कुड्डालोरपर्यंत प्रगती आहे. ईशान्य भारतात आणखी वाटचाल करताना त्रिपुरा, अासाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागांत मॉन्सून पोचल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे थांबलेला नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) उत्तरेकडील प्रवास सुरू झाला आहे. शुक्रवारी (ता. १४) मॉन्सून केरळचा उर्वरित भाग व्यापून दक्षिण कर्नाटकात दाखल झाला आहे. मॉन्सूनने कर्नाटकातील मंगळूर, म्हैसूरपर्यंत मजल मारली आहे, तर तमिळनाडूतील सालेम, कुड्डालोरपर्यंत प्रगती आहे. ईशान्य भारतात आणखी वाटचाल करताना त्रिपुरा, अासाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागांत मॉन्सून पोचल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

सोमवारी (ता. १०) केरळच्या कन्नूरपर्यंत पोचलेल्या मॉन्सूनने चार दिवसांनी पुढे वाटचाल केली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पुढील वाटचालीस पोषक हवामान तयार होत असल्याने कर्नाटक तमिळनाडूच्या आणखी काही भागांसह मध्य अरबी समुद्रात मॉन्सूनची प्रगती शक्य आहे. तर बंगालच्या उपसागरावरूनही मॉन्सून पुढे चाल करणार असून, रविवारपर्यंत (ता. १६) सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या उत्तर भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

दरम्यान यंदा मॉन्सूनची वाटचाल खूपच अडखळत सुरू आहे. आगमनास प्रतिकूल स्थिती असल्याने यंदा केरळात नियमित वेळेच्या तब्बल आठवडाभर उशिराने मॉन्सून डेरेदाखल झाला. शनिवारी (ता. ८) केरळच्या कोचीसह तमिळनाडूच्या मदुराईपर्यंतची मजल मारली. दोन दिवसांत सोमवारी (ता. १०) किनाऱ्यावर आणखी प्रगती करत कन्नूरपर्यंतचा टप्पा पूर्ण करून, केरळचा बहुतांशी भाग व्यापला होता. मॉन्सून साधारणतः १३ जूनपर्यंत महाराष्ट्रात पोचण्याची शक्यता असतानाच अरबी समुद्रात ‘वायू’ वादळाची निर्मिती झाली. चक्रीवादळामुळे मॉन्सूनची वाटचाल प्रभावित झाली. तसेच समुद्रावरील बाष्प ओढून घेतल्याने मॉन्सूनचे राज्यातील आगमनही लांबले आहे. ‘वायू’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असल्याने मॉन्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. 

‘वायू’ चक्रीवादळ ओसरायला लागले
अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत घोंघावत असलेले वायू चक्रीवादळ ओसरायला लागले आहे. रविवारपर्यंत (ता. १६) वादळाची तीव्रता आणखी कमी होणार आहे. शुक्रवारी (ता. १४) सकाळी साडेआठ वाजता हे वादळ गुजरातच्या किनाऱ्यापासून पश्चिमेकडे सरकू लागले आहे. पोरबंदरपासून पश्चिमेकडे १५० किलोमीटर, वेरावळपासून २१० किलोमीटर, तर दीवपासून २७० किलोमीटर पश्चिमेकडे ही प्राणली होती. वादळाच्या प्रभावामुळे किनारपट्टीलगतच्या भागात ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. आज (ता. १५) गुजरातमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

इतर अॅग्रो विशेष
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...