Agriculture news in Marathi Monsoon reaches Karnataka | Page 3 ||| Agrowon

मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 जून 2021

नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल झाल्यानंतर वेगाने प्रवास सुरू झाला आहे. शुक्रवारी (ता. ४) मॉन्सूनने वेगाने चाल करत उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशपर्यंत मजल मारली आहे.

पुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल झाल्यानंतर वेगाने प्रवास सुरू झाला आहे. शुक्रवारी (ता. ४) मॉन्सूनने वेगाने चाल करत उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशपर्यंत मजल मारली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अंदमान बेटांवर यंदा एक दिवस उशिराने दाखल झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘यास’ चक्रीवादळाने मॉन्सूनचा वेग वाढविला. मॉन्सून वेळेच्या (१ जून) आधी ३१ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता असतानाच, मोसमी वाऱ्यांसाठी पोषक स्थिती नसल्याने, मॉन्सूनचे केरळातील आगमन लांबले होते.

अरबी समुद्रावरून जवळपास सात ते आठ दिवसांनंतर येणाऱ्या वाऱ्यांमुळे प्रवाह सक्रिय झाले. नियमित वेळेच्या (१ जून) दोन दिवस उशिराने मॉन्सून गुरुवारी (ता. ३) दक्षिण केरळात दाखल झाला. दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने वेगाने वाटचाल करत संपूर्ण केरळसह, कर्नाटक किनारपट्टीचा बहुतांशी भाग, कर्नाटकचा दक्षिण अंतर्गत भाग, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश, तसेच बंगालच्या उपसागसाच्या काही भागांत प्रगती केली आहे.

पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने संपूर्ण कर्नाटक, गोव्यासह, महाराष्ट्राच्या काही भागांत मॉन्सून दाखल होणार आहे. तसेच संपूर्ण तमिळनाडू व्यापून, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ईशान्य भारताच्या काही भागांत दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रवासादरम्यान बहुतांश भागांत मेघगर्जना व विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये शेवग्याला २००० ते ४५०० रुपये दरनगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली; दरात घटनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...
परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके...परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी...
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण...रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास...
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता...
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे...
साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा...सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात...
आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे,...
नदीकाठावरील ऊस वाहून गेलानेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या...
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
पुण्यात आले, टोमॅटो दरांत सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
वातावरण बदलात पारंपरिक वाण टिकवतील...भारतामधील भूजल साठ्यामध्ये सर्वांत श्रीमंत राज्य...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....