मिझोराम, मणिपूरमध्ये मॉन्सूनची हजेरी

मिझोराम, मणिपूरमध्ये मॉन्सूनची हजेरी
मिझोराम, मणिपूरमध्ये मॉन्सूनची हजेरी

पुणे : बंगालच्या उपसागरातील शाखेला चाल मिळाल्याने शुक्रवारी (ता. १) माॅन्सूनने ईशान्य भारतातील मिझोराम आणि मणिपूर राज्याच्या काही भागापर्यंत मजल मारली. वाटचालीस पोषक स्थिती असल्याने रविवारपर्यंत (ता.३) ईशान्येकडील आणखी काही राज्यांमध्ये मॉन्सून दाखल होणार आहे. तर अरबी समुद्रावरील शाखेने प्रगती न केल्याने दक्षिण भारतातील मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  मॉन्सूनच्या अरबी समुद्रातील शाखेने बुधवारी (ता. ३०) कर्नाटक किनारपट्टी, दक्षिणअंतर्गत कर्नाटक, तमिळनाडूचा काही भाग व्यापला आहे. त्यानंतर दोन दिवस मॉन्सूनने या भागात प्रगती केली नाही. मंगळवारपर्यंत (ता. ५) मॉन्सूनची वाटचाल काहीशी संथगतीने होणार आहे. त्यानंतर विषुववृत्ताकडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढणार असून, कर्नाटकच्या आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होईल, असे सांगण्यात आले आहे.  शनिवारपासून (ता. २) रायलसीमा दक्षिण कर्नाटकमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही मंगळवारपासून (ता. ५) तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ६ जूननंतर महाराष्ट्र आणि गोव्यात पाऊस जोर वाढणार आहे. तर ६ ते ८ जूनपर्यंत महाराष्ट्रात माॅन्सून पोचणे होणे शक्य असल्याचे हवामान विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com