agriculture news in Marathi Monsoon return from half state Maharashtra | Agrowon

निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनची माघार 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून वेगाने प्रवास सुरू केला आहे. सोमवारी (ता.२६) संपूर्ण विदर्भासह निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. 

पुणे : परतीच्या मॉन्सूनने गेल्या आठवड्यापासून वेगाने प्रवास सुरू केला आहे. सोमवारी (ता.२६) संपूर्ण विदर्भासह निम्म्या महाराष्ट्रातून मॉन्सूनने माघार घेतली आहे. राज्यातील डहाणू, नाशिक, नांदेडपर्यंतचा भाग व तेलंगाणा, आंध्र प्रदेश व ओडिशातील श्रीनिकेतन, कूछ बेहर, घस्तीला, केवजरगड, नोवरंगपूर, इल्लूरू नालगोंडा या भागातून मॉन्सूनचे वारे माघारी फिरले आहे. 

दरम्यान उद्यापर्यंत (ता.२८) मॉन्सून संपूर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता हवामान 
विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. 

यंदा हवामान विभागाने बदलेल्या हवामान नियोजनानुसार १७ सप्टेंबरला परतीच्या मॉन्सूनचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज दिला होता. मात्र, नियमित सर्वसाधारण वेळेच्या तब्बल अकरा दिवस उशिराने मॉन्सून परतीच्या प्रवासाला सुरूवात झाली होती. वायव्य भारतातील पश्चिम राजस्थानातून २८ सप्टेंबर रोजी मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला. सहा ऑक्टोबर रोजी बहुतांशी वायव्य आणि उत्तर भारतातून वारे परतले. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे परतीच्या प्रवासाला अडथळा तयार होऊन परतीचा मॉन्सून रेंगाळला होता. 

राज्यात गेले पंधरा दिवस मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. वादळी वारे, विजांच्या कडकटासह मध्यम महाराष्ट्र, 
कोकण, मराठवाडा व विदर्भात मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे राज्यातून परतीच्या मॉन्सूनच्या वाऱ्यांनी माघार घेतली असून परतीच्या सुधारित वेळा पत्रकानुसार पंधरा ऑक्टोबरपर्यंत मॉन्सून देशातून माघारी जाणे अपेक्षित होते. उद्या मॉन्सून देशाचा निरोप घेण्याची शक्यता असून, त्यानंतर दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सून सक्रिय होणार 
असल्याची शक्यता आहे. 

राज्यातून मॉन्सूनने माघार घेतलेली वेळ 

वर्ष तारीख 
२०१९ १३ ते १५ ऑक्टोबर 
२०१८ ५ ते ६ ऑक्टोबर 
२०१७ १५ ते १६ ऑक्टोबर 
२०१६ १४ ते १५ ऑक्टोबर 
२०१५ ६ ते १४ ऑक्टोबर 

 


इतर अॅग्रो विशेष
केंद्राचा चर्चेचा प्रस्ताव नाकारला;...नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या वतीने...
...येथे कांदा रोपे राखणीसाठी...विसापूर, जि. सातारा  : सोन्याचे दाग-दागिने,...
कृषी विभागात आगामी बदल्या समुपदेशनाने...पुणे : कोविड-१९ साथीमुळे कृषी विभागात यंदा...
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या...पुणे :  निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत...
कृषी पदव्युत्तर पदवीच्या प्रवेश...पुणे : राज्यातील चारही कृषी विद्यापीठाअंतर्गत...
सातत्य राखलेले पशुपालन ठरले शेतीलाही...यवतमाळ जिल्ह्यातील लोही (ता. दारव्हा) येथील...
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा...नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक...
वीस हजार अन्न प्रक्रिया उद्योग होणार...पुणे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन...
महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर...मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता...
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...