मॉन्सून परतीवर

गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम राजस्थानात दाखल झालेल्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
monsoon journey
monsoon journey

 पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम राजस्थानात दाखल झालेल्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सोमवारी (ता.२८) पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागांतून मॉन्सून माघारी फिरला असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली. माॅन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक असलेली चक्राकार वाऱ्याची स्थिती देशाच्या वायव्य भागात तयार झाली आहे. तसेच राजस्थानच्या दक्षिण भागातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे पंजाबच्या अमृतसर, भटिंडा आणि राजस्थानमधील हनुमानगड, बिकानेर, जैसलमेर या भागापर्यंत मॉन्सूनने माघार घेतली आहे. या भागात मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेली पोषक स्थिती कायम आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हरियाना, चंदीगड आणि दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या काही भागातून मॉन्सूनचे वारे परतण्याची शक्यता आहे. यंदा परतीचा प्रवास लांबल्याची स्थिती असून उशिराने प्रवास सुरू झाला आहे. उत्तर भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाना, चंडीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान या भागांत पावसाची उघडीप आहे.  त्यामुळे वातावरणात झपाट्याने बदल होऊ लागले आहेत. परतीच्या प्रवासामुळे वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहण्यास सुरुवात होऊ लागली आहे.  त्याचवेळी उत्तरेकडील हवेचे दाब वाढू लागले आहेत. तर दक्षिणेकडील हवेचे दाब कमी होण्यास सुरुवात झाली आहे. ईशान्येकडील हवेचे दाब जास्त असल्याने वारे ईशान्येकडून बाष्प घेऊन दक्षिणेकडे येतील. टप्याटप्याने हे वारे दक्षिणेकडे सरकणार असल्यामुळे अनेक भागात जोरदार पाऊस होईल.

पश्चिम राजस्थानातील गंगानगर येथे ३९.२ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. तर उत्तर कर्नाटकातील बेलगाम येथे सर्वांत कमी १८.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमान नोंदविले गेले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com