agriculture news in Marathi monsoon on return journey Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मॉन्सून परतीवर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम राजस्थानात दाखल झालेल्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. 

 पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम राजस्थानात दाखल झालेल्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सोमवारी (ता.२८) पश्चिम राजस्थान आणि पंजाबच्या काही भागांतून मॉन्सून माघारी फिरला असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली.

माॅन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक असलेली चक्राकार वाऱ्याची स्थिती देशाच्या वायव्य भागात तयार झाली आहे. तसेच राजस्थानच्या दक्षिण भागातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे पंजाबच्या अमृतसर, भटिंडा आणि राजस्थानमधील हनुमानगड, बिकानेर, जैसलमेर या भागापर्यंत मॉन्सूनने माघार घेतली आहे. या भागात मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेली पोषक स्थिती कायम आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हरियाना, चंदीगड आणि दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या काही भागातून मॉन्सूनचे वारे परतण्याची शक्यता आहे.

यंदा परतीचा प्रवास लांबल्याची स्थिती असून उशिराने प्रवास सुरू झाला आहे. उत्तर भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाना, चंडीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान या भागांत पावसाची उघडीप आहे.  त्यामुळे वातावरणात झपाट्याने बदल होऊ लागले आहेत. परतीच्या प्रवासामुळे वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहण्यास सुरुवात होऊ लागली आहे.

 त्याचवेळी उत्तरेकडील हवेचे दाब वाढू लागले आहेत. तर दक्षिणेकडील हवेचे दाब कमी होण्यास सुरुवात झाली आहे. ईशान्येकडील हवेचे दाब जास्त असल्याने वारे ईशान्येकडून बाष्प घेऊन दक्षिणेकडे येतील. टप्याटप्याने हे वारे दक्षिणेकडे सरकणार असल्यामुळे अनेक भागात जोरदार पाऊस होईल.

पश्चिम राजस्थानातील गंगानगर येथे ३९.२ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. तर उत्तर कर्नाटकातील बेलगाम येथे सर्वांत कमी १८.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमान नोंदविले गेले.


इतर अॅग्रो विशेष
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
सोशल मिडीयावर ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडनांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर...
`समृद्धी`वर उभारणार गोदामे, शीतगृहे पुणेः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना शेतमाल...
पुण्यातील फूल बाजाराच्या कामाला गती पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने...
राज्यात ठिकठिकणी जोरदार पाऊस पुणेः राज्यातील पावसाचा प्रभाव कमी...
केळी निर्यातीसाठी ‘बनानानेट’च्या...नागपूर: राज्यातून केळीची निर्यात वाढल्यानंतर आता...
देशातील सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने...जळगाव ः देशातील सुमारे ७१५ सूतगिरण्या ९५ टक्के...
जिल्हानिहाय ऑनलाइन निविष्ठा परवाने वाटप...पुणे: राज्यात खते, बियाणे व कीडनाशकांच्या...
ओतूरमध्ये कांद्याला किलोला कमाल ८०...पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीच्या...
जोरदार पावसाचा अंदाज पुणे ः राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी...
राज्यांचा निर्धार नि केंद्राची माघार‘जीएसटी’ अंतर्गत राज्यांना द्यावयाच्या...
भुकेला भारतजागतिक भूक निर्देशांक-२०२० नुकताच प्रसिद्ध झाला...