agriculture news in Marathi, Monsoon return journey may be from 5th October, Maharashtra | Agrowon

मॉन्सूनचा परतीचा प्रवास ५ ऑक्टोबरनंतर शक्य

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) अद्याप राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू कलेला नाही. पश्‍चिम राजस्थानात पडत असलेला पाऊस पाच ऑक्टोबरपर्यंत सुरूच राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरवात होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातून १५ ते २० ऑक्टोबर या कालवधीत मॉन्सून माघारी फिरण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) अद्याप राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू कलेला नाही. पश्‍चिम राजस्थानात पडत असलेला पाऊस पाच ऑक्टोबरपर्यंत सुरूच राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरवात होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातून १५ ते २० ऑक्टोबर या कालवधीत मॉन्सून माघारी फिरण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

सप्टेंबर उलटूनही परतीच्या प्रवासासाठी पोषक हवामान नसल्याने यंदा मॉन्सूनचा देशातील मुक्काम चांगलाच लांबला आहे. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार १ सप्टेंबर रोजी पश्‍चिम राजस्थानमधून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. तर साधारणत: १ ऑक्टोबर रोजी कोकणाचा बहुतांशी भाग, मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागातून मॉन्सून परतत असतो.

डॉ. कश्यपी म्हणाले, की मॉन्सूनचा परतीचा प्रवासाची घोषणा करण्यासाठी सलग पाच दिवस पावसाची उघडीप असणे, हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होणे, हवेचा खालच्या थरात केंद्रभागी दाब अधिक असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती (ॲण्टी सायक्लोनिक सर्क्युलेशन) निर्माण होणे आवश्यक असते. पश्‍चिम राजस्थानमधील बिकानेर, गंगापूर, जैसलमेर या भागांत अद्यापही पाऊस पडत असून, सकाळच्या वेळी आर्द्रता ७० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. १ ऑक्टोबरपर्यंत हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. 

मॉन्सूनचे लांबलेले आगमन हे यंदाच्या हंगामाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. सुरवातीपासूनच मॉन्सूनची वाटचाल अडखळत झाली. १८ मे रोजी अंदमानात पोचलेल्या मॉन्सूनचा पुढील प्रवास लांबला. देवभूमी केरळात तब्बल आठवडाभर उशिराने ८ जून रोजी मॉन्सून दाखल झाला. अरबी समुद्रात तयार झालेल्या अतितीव्र ‘वायू’ चक्रीवादळाने मॉन्सूनची वाटचाल रोखून धरली. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावलाच, तसेच बाष्प ओढून नेल्याने पाऊसही लांबला.

साधारणत: ७ जूनपर्यंत तळ कोकणात पोचणारा मॉन्सून, यंदा २० जून रोजी तळकोकणात पोचला. तसेच २५ जून रोजी वाऱ्यांनी राज्य व्यापले. त्यांनतर मजल दरमजल करत दीर्घकालीन सर्वसाधारणा वेळेच्या पाच दिवस उशिराने म्हणजेच १९ जुलै रोजी मॉन्सूनने देश व्यापला. सध्या संपूर्ण देशात मॉन्सूनचे अस्तित्व असून, परतीचा प्रवासाची सुरवात आणखी लांबणार आहे.

गेल्या काही वर्षांतील मॉन्सूनचा परतीचा प्रवास

वर्ष    तारीख
२०१३    ९ सप्टेंबर
२०१४  २३ सप्टेंबर
२०१५  ४ सप्टेंबर
२०१६  १५ सप्टेंबर
२०१७   २७ सप्टेंबर
२०१८  २९ सप्टेंबर

 


इतर अॅग्रो विशेष
चक्रीवादळ अलिबागजवळ १ ते ३च्या दरम्यान...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
दीडपट 'एमएसपी' म्हणजे निव्वळ धूळफेक :...पुणे: मोदी सरकारने खरिपासाठी जाहीर केलेल्या किमान...
टोळधाडीवर दोन दिवसात नियंत्रण मिळविणार नागपूर ः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गेल्या...
‘निसर्ग’ चक्रीवादळ आज अलिबागजवळ धडकणार पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...
मॉन्सून कर्नाटकात आज धडकणारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
बॅंकांसाठी आठ-अ, फेरफार उतारे थेट...पुणे: सातबारा संगणकीकरण उपक्रमाला लॉकडाउनमुळे...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे: अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’...
‘निसर्ग’चक्रीवादळाची तीव्रता वाढली;...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या...
अल्पमुदतीच्या कृषिकर्ज फेडीस...नवी दिल्ली : तीन लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या...
हमीभाव जाहीर : कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये...नवी दिल्ली : केंद्र सरकारने खरीप २०२०-२१करिताचे...
महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ‘निसर्ग’...पुणे  : अरबी समुद्रात महाराष्ट्र,...
देशात यंदा १०२ टक्के पावसाची शक्यता :...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून...
पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीने मॉन्सूनची...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
केरळचा बहुतांश भाग मॉन्सूनने व्यापलापुणे  : महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना...
टोळधाड नियंत्रणासाठी हेलिकॉप्टर अन्...नागपूर ः विदर्भात अग्निशमन यंत्राच्या माध्यमातून...
निर्यातक्षम उत्पादन, बाजारपेठांचा शोध...नाशिक जिल्ह्यातील नैताळे (ता.निफाड) येथील...
राईसमिल, पोहे निर्मितीतून व्यवसायवृद्धीवेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे शंकर जाधव...
देशात यंदा सर्वसाधारण मॉन्सून; १०२...नवी दिल्ली : देशात यंदा सर्वसामान्य मॉन्सून आणि...